Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 1,210.00Rs. 1,028.00
Availability: 50 left in stock
1) मास्टर मेंटॉर्स........
(सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या महान लोकांच्या अंतदृष्टी)
लेखक:- स्कॉट जेफरी मिलर
पाने:- 224

असे अनेक लोक असतात, ज्यांना आयुष्यभर नवीन काहीतरी शिकण्याची आस असते, ज्यांना यशाची नवनवीन शिखरे गाठायची असतात आणि त्यासाठी ते नेहमी प्रॅक्टिकल अशा टेक्निक्सच्या मार्गदर्शनाच्या शोधात असतात, अशा सर्वांसाठी मास्टर मेंटॉर्स हे अतिशय उपयुक्त पुस्तक आहे. या पुस्तकामध्ये जगातील ३० सर्वश्रेष्ठ मार्गदर्शकांच्या मनन आणि चिंतनाचं सार दिलेलं आहे. या महान हस्तींमध्ये टॉप बिझनेस माइंडस्बरोबरच आजच्या काळातील सर्वोत्कृष्ट थॉट लीडर्सचाही समावेश आहे.

या पुस्तकात फ्रँकलिन कोव्हेच्या ग्लोबल पॉडकास्ट 'फ्रँकलिनकोव्हे ऑन लीडरशीप पॉडकास्ट' वर स्कॉट यांनी ज्या महान हस्तींच्या मुलाखती घेतल्या, त्यातील ३० महान लोकांच्या अशा अंतर्दृष्टी समाविष्ट करण्यात आल्या आहेत, ज्यांनी त्यांचं आयुष्यच बदलून टाकलं.

या पुस्तकात........

> तुम्ही स्वतःला जसे सादर करता तो तुमचा ब्रँड बनतो..
> विचारपूर्वक ठरवलेले धोरण विरुद्ध त्वरित ठरवलेले धोरण
> आकर्षक स्कोअरबोर्ड तयार करा !
> नवीन शोध लावणं शक्य नसेल, तर आहे त्यात बदल करा
> कार्यक्षमता आणि प्रभावीपणाचा समतोल
> निर्भय विरुद्ध बेफिकीर
> दृष्टिकोनाची शक्ती.... अशा ३० अंतर्दृष्टी

2) दशा बदलायची असेल तर दिशा बदला.
(एक छोटासा संकेतसुद्धा जीवनात खूप मोठं परिवर्तन घडवून आणतो)
लेखक:- मनोज अंबिके
पाने:- 208

लहानपणापासून आपण एक वाक्य ऐकत आलो आहे की, ‘समस्या का तयार होतात तर, त्यांच्याकडे वेगळ्या दृष्टीने न बघितल्यामुळे.’ जसं, घोडा का अडला? भाकरी का करपली? पान का खराब झाले? तर न फिरवल्याने, हे सर्वांनीच ऐकलं आहे.
खरंतर, आता मला ही भाकरी फिरवली पाहिजे, हा संकेत प्रत्येकाला येत असतो. परंतु संकेत समजण्याकडे आपला कल नसतो, आपण तिकडे दुर्लक्ष करतो. अनेकदा जीवनात नवीन दिशेने जाण्यासाठी प्रयत्न व्हायला हवा, असे संकेत येत असतात. अनेकदा नवीन संधी, नवीन गोष्टी आपल्यासमोर येऊन उभ्या ठाकतात. पण फक्त आपण दुर्लक्ष केल्यामुळे ती संधी निघून जाते. नवीन दिशा आपल्या समोर असूनसुद्धा आपण तिकडे दुर्लक्ष करतो.
तर अनेकांच्या बाबतीत मात्र एक छोटासा संकेतसुद्धा जीवनात खूप मोठं परिवर्तन घडवून आणतो. कारण हा छोटासा संकेत, छोटी संधी त्यांना विचार करायला भाग पाडते.
या पुस्तकाचादेखील हाच उद्देश आहे, जीवनाकडे बघताना अनेक नवीन दिशा, अनेक नवीन दालनं, अनेक नवीन रस्ते आपल्यासमोर उपलब्ध असतात. त्यावर कसे चालायचे, यावर हे पुस्तक मार्गदर्शन करेल.
यातील सांगितलेली तंत्रे, संकेत, पद्धती या लहानच आहेत पण अत्यंत परिणामकारक आहेत. इंग्रजीत अशी एक म्हण आहे, Small Things make Whole Difference. लहान लहान गोष्टी खूप मोठा फरक पाडतात. तसंच या बाबतीत देखील आहे. प्रत्येक गोष्ट स्वतःचा वेगळा ठसा उमटून जाईल.
यातील संकेत, दृष्टीकोन, पद्धती समोर मांडताना जीवनातील सर्व भागांना स्पर्श करायचा प्रयत्न केला आहे. मग तो शारीरिक भाग असेल, मानसिक असेल, सामाजिक असेल, आर्थिक असेल, बौद्धिक असेल, आध्यात्मिक असेल किंवा भावनिकदेखील असेल. ज्यामुळे परिपूर्णतेकडे वाटचाल होईल.
हे पुस्तक वाचून अनेकांच्या जीवनात नवीन दिशा, नवीन संभावना प्रकट होतील.

3) पॉवर ऑफ 1थिंग
(एका गोष्टीची शक्ती.....फक्त 'एक गोष्ट' बदलून सगळं काही बदलू शकत असेल तर !)
डॉ. रँडी कार्लसन
अनुवाद : विशाखा कुलकर्णी
पाने:- 224

जीवनात इंटेन्शनली बदल घडवण्यासाठी........
प्रत्येकाला आपल्या जीवनात सुधारणा करावीशी वाटत असते. त्यासाठी एकदमच अनेक गोष्टींची सुरुवात केली जाते. मग अर्थातच त्या सगळ्याचं दडपण येतं आणि प्रयत्न करणंच सोडून दिलं जातं.
या पुस्तकाच्या पहिल्या भागात लेखकाने पॉवर ऑफ वन थिंग ही संकल्पना उलगडून सांगितली आहे. त्याचबरोबर ही संकल्पना अंमलात आणताना कोणते अडथळे येतात, हेही सांगितले आहे. आपल्या जीवनात चांगला आणि मोठा बदल घडवून आणतील, अशा ‘‘वन थिंग्ज’’ कोणत्या आहेत ते ठरवण्यासाठी हे पुस्तक मदत करतं.
या पुस्तकाच्या दुसर्‍या भागात पॉवर ऑफ वन थिंग ही संकल्पना व्यवहारात कशी वापरायची, हे समजते. आपलं जीवन सुखकर होण्यासाठी साधारणपणे नऊ वैयक्तिक आव्हानांचा सामना करावा लागतो. एका गोष्टीची शक्ती (पॉवर ऑफ वन थिंग) वापरून आपण या नऊ प्रकारच्या समस्यांचा कसा प्रतिकार करायचा ते या दुसर्‍या भागात उदाहरणांसहित स्पष्ट केलं आहे.
या पुस्तकात लेखकाने 'पॉवर ऑफ वन थिंग'चा उपयोग करून गुणवत्तापूर्ण जीवन कसं जगता येईल याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. त्यांनी सांगितलेली 'वन थिंग'ची पद्धत अतिशय सोपी आणि सहज वापरता येण्यासारखी आहे. त्यामुळे तुम्ही तुमची ध्येयं सहज गाठू शकाल. पॉवर ऑफ वन थिंग अर्थात एका गोष्टीची शक्ती तुम्हाला तुमची मोठमोठी स्वप्नं पूर्ण करण्यासाठी मदत करेल.

या पुस्तकात....
पॉवर ऑफ वन थिंग
• वेळेचा सदुपयोग करण्यासाठी
• विचार व दृष्टिकोन बदलण्यासाठी
• जीवन सुव्यवस्थित करण्यासाठी
• भावनांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी
• शब्दांमध्ये परिवर्तन घडवण्यासाठी
• निर्णयप्रक्रियेत बदल घडवण्यासाठी

4)१२ पॉवर प्रिन्सिपल्स फॉर सक्सेस.
(वेगवान यश मिळवून देणाऱ्या बारा पायऱ्या....)
लेखक:- बॉब प्रॉक्टर
पाने:- 176

या जगात असे अनेक लोक आहेत जे खर्‍या अर्थी यशस्वी असतात तर काही लोक यश मिळवण्यासाठी संपूर्ण आयुष्य खर्च करतात. हे लोक आपल्या दैनंदिन गरजा भागवण्यात इतके गुंतलेले असतात की, त्यांच्याकडे यशस्वी लोकांचा अभ्यास करायला वेळच नसतो. पण जे अभ्यास करतात त्यांना हेच समजतं की, ‘यश हा फक्त एक निर्णय आहे.’
हा निर्णय घेऊन या पुस्तकाच्या मदतीने प्रत्येक जण, जिथे कुठे असेल तिथून सुरुवात करू शकेल आणि त्याचे त्वरित परिणाम त्याला दिसून येऊ लागतील. लेखकाने 12 पॉवर प्रिन्सिपल या पुस्तकाच्या माध्यमातून वेगवान यश मिळवून देणार्‍या बारा पायर्‍याच आपल्यासमोर मांडल्या आहेत. यातील प्रत्येक प्रिन्सिपलवर लेखक बॉब प्रॉक्टर यांनी अगदी सखोल मार्गदर्शन केले आहे, ज्याचा अवलंब केल्यास यश, समाधान आणि जीवनाचा आनंद मिळणं सहज शक्य होईल. दृष्टिकोन, पैसा, ध्येय, कृती, आत्मविश्वास यांसारख्या या बारा प्रिन्सिपल्सच्या माध्यमातून लेखकाने जीवनातील सर्व आयामांना स्पर्श केला आहे. संपूर्ण व्यक्तिमत्त्वविकासासाठी आवश्यक असणार्‍या प्रत्येक भागाबद्दल ज्ञान देणारे हे प्रिन्सिपल्स प्रत्येकसाठी जीवन पथदर्शकच आहेत.

5) डुईंग द राईट थिंग्ज राईट.
(योग्य काम योग्य पद्धतीने करण्याची कला.)
लेखक: लॉरा स्टॅक
पाने:-224

(प्रभावी नेतृत्व कसं करायचं याचं मार्गदर्शक गाईड)
या पुस्तकामध्ये लॉरा स्टँक यांनी २१ व्या शतकातील दोन महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकला आहे कार्यक्षमता आणि कार्यकुशलता.
जर तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी असामान्य योगदान द्यायचं असेल तर योग्य काम योग्य पद्धतीने करायला हवं. कार्यकुशलता म्हणजे योग्य पद्धतीने काम करणं आणि कार्यक्षमता म्हणजे जे योग्य काम आहे ते कमीत कमी वेळेत, कमी श्रमात आणि कमीत कमी संसाधनांच्या मदतीने कमी खर्चात पूर्ण करणं. ड्रकर म्हणतात त्याप्रमाणे, जी गोष्ट करण्याची गरजच नव्हती ती जास्त चांगल्या कार्यक्षमतेने करणं म्हणजे वेळेचा सर्वात जास्त अपव्यय आहे.
लॉरा स्टँक यांच्या ३ टी या संकल्पनेमध्ये त्यांनी १२ रणनीती सांगितल्या आहेत ज्यामुळे काम करणाऱ्यांना जास्त चांगल्या कार्यकुशलतेने आणि कार्यक्षमतेने त्यांचं काम पूर्ण करता येईल. कोणताही अधिकारी त्याचा वेळ ज्या तीन महत्त्वाच्या कामांसाठी देतो त्यावर त्यांनी प्रकाश टाकला आहे आणि ती तीन कामं म्हणजे धोरणात्मक विचारसरणी, संघभावनेतून काम आणि रणनीती. या तीन क्षेत्रांमधील त्यांच्या सूचना आणि कल्पनांच्या मदतीने तुम्हाला तुमची कार्यक्षमता वाढवण्यासाठी निश्चितच मोठ्या प्रमाणावर मदत होईल.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

How To Do Smart Work (Smart Work कसे करायचे हे सांगणाऱ्या पाच बेस्टसेलर पुस्तकांचा संच)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books