Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम हे युवकांमध्ये अतिशय लोकप्रिय होते. तेही मुलांमध्ये रमत. मुले दिसले की प्रोटोकॉल सोडून ते त्यांच्याजवळ संवाद साधायला जात असत. सोशल मिडीयामुळे युवकांशी रोज संवाद साधण्याची संधी त्यांना मिळाली. तेथे हजारो युवक त्यांना विविध प्रश्न विचारीत. त्या सर्वांना ते उत्तर देत. तरुण भारतीयांच्या मनातील चिंता, समस्यांवर डॉ. कलाम यांनी दिलेली समर्पक उत्तरे आपल्याला 'असे घडवा तुमचे भविष्य 'मधून वाचायला मिळतात. स्वत:वर विश्वास ठेवल्यास आयुष्यात कसा कायापालट होतो, मोठी स्वप्न बघण्याचा फायदा, वेळेचा सदुपयोग, अपयशावर मात, धैर्य, साहस, प्रामाणिकपणा याचे महत्त्व, भ्रष्टाचाराची कीड, तो निपटण्याची गरज, त्याचे मार्ग, एकत्र कुटुंबाचे फायदे, जीवनात कलेचे, पर्यावरणाचे महत्त्व विषद केले आहे. समाजाच्या प्रगतीचे मूळ महिला सशक्तीकरणात असल्याचे डॉ. कलाम यांनी मेरी क्यूरी, सिस्टर अँटोनिया यांची उदाहरणे देत सांगितले आहे. मजबूत, सशक्त भारत, जागतिक स्पर्धा या विषयांवरही त्यांनी मार्गदर्शन केले. वैयक्तिक विकास, सामाजिक, राष्ट्रीय प्रश्न, समस्यांवर ते बोलले आहेत. त्यांनी पुस्तकात दिलेला संदेश युवकांना प्रत्येक क्षेत्रात उपयोगी पडेल
‘‘माझ्या आयुष्यात येणार्या इतक्या सार्या अडचणींसमोर हार न मानता मी जर इतकं काही करू शकलो तर कोणीही हे करू शकतं, हाच संदेश मी या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या देशातील युवकांना देऊ इच्छितो. या पुस्तकातून प्रेरणा घेऊन एका जरी युवकाने स्वतःचं स्वप्न साध्य केलं तर माझा लिहिण्याचा हा प्रयत्न यशस्वी झाला असं मी समजेन. हे पुस्तक देशभरातील युवकांनी मेल्सद्वारे विचारलेल्या प्रश्नांवर आधारित आहे आणि त्यांना दिलेली उत्तरं ही माझ्या जीवनातील अनुभवातून मी जे काही शिकलो त्याचे सार आहे. ही उत्तरं अशा प्रकारे समोर मांडली आहेत, की जे वाचक अशाप्रकारच्या समस्यांना तोंड देत आहेत त्यांनासुद्धा या उत्तरांमध्ये दडलेले संदेश उपयोगी पडतील.’’ -या पुस्तकातील भूमिकेमधून 2002 पासून 2007 पर्यंत डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांनी भारताचं राष्ट्रपती पद भूषवलं. राष्ट्रपती पदावर असताना ते जितके लोकप्रिय होते तितकेच आजही आहेत. प्रेरणा, सल्ला, मार्गदर्शन यासाठी किंवा त्यांच्याशी असलेलं एक आपुलकीचं नातं म्हणून लोक त्यांच्याशी संपर्क साधतात. त्यांचे विचार, त्यांची जीवनमूल्यं, समस्यांना दिलेली उत्तरे ही, जीवनाच्या खडतर वाटेवरून चालताना खरेपणाच्या कसोटीवर उतरलेली त्यांची शिकवण आहे, ज्यापासून आपण खूप काही शिकू शकतो. वैयक्तिक विकासाच्या आव्हानापासून (ज्याला आपण आपल्या जीवनात रोज सामोरं जातो.) ते समाजिक आणि राष्ट्रीय बहुआयामी कठीण प्रश्नांचा सामना करण्यापर्यंत, हे पुस्तक संपूर्ण आणि सार्थक जीवन जगण्याची प्रेरणा देते.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books