Shivadnya Ek Jbabdari By Krushnakanat Ganpat Desai (शिवाज्ञा एक जबाबदारी)
Shivadnya Ek Jbabdari By Krushnakanat Ganpat Desai (शिवाज्ञा एक जबाबदारी)
शिवराय आणि वर्तमान यांचा सुरेख संगम साधत, आयुष्याचं सार समजवणारं ‘शिवाज्ञा...एक जबाबदारी’ हे पुस्तक आहे. आपणा सर्वांना इतिहास माहितीये, त्याचा अभिमानसुद्धा आहे. पण तो इतिहास आज वैचारिकरित्या कसा जीवंत ठेवता येईल, महाराजांची विचारधारा कशी जीवंत राहील याची ही खरी पद्धत म्हणता येईल. चंद्रकोर लावून, गळ्यात फोटो अडकवून किंवा सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकून, मुलींना असुरक्षित वाटेल अशी वागणूक देणार्या, शिवकन्या-शिवपुत्र म्हणवणार्या, इतरांच्या विचारांची धूळधाण उडविणार्या, जात-धर्म-पंथ यात अडकून सामाजिक वातावरण दूषित करणार्या प्रत्येक मुलाच्या/मुलीच्या डोक्यात शिरून आपण गनिमी काव्याने त्यांच्यात खरं शिवाज्ञेचं बाळकडू उतरवणं, या कार्यासाठी हे पुस्तक कटिबद्ध आहे.
स्वप्न शहाजीराजांचे, संकल्पना राजमाता जिजाऊंची, विचार छत्रपती शिवरायांचे, शौर्य युवराज छत्रपती शंभुराजांचे, आणि जबाबदारी मावळ्यांची..