Time And Self Management By Kanchan Dixit
Time And Self Management By Kanchan Dixit
जन्म आणि मृत्यू यांच्यात लंबकासारखा फिरणारा वेळ म्हणजे आपल्याला मिळालेलं आयुष्य. या वेळेची सूत्रे ज्याला हाती ठेवता आली, त्याला आयुष्य सुखा-समाधानानं जगता आलं. अनेकांना ही उपरती होते वेळ निघून गेल्यानंतर. यासाठी वेळ व आयुष्य यांचं डोळसपणे व्यवस्थापन करता येणं आवश्यक आहे. यासाठी -
. घड्याळाचे कुसंस्कार कसे पुसावेत?
. स्पष्टतेचे सामर्थ्य म्हणजे काय?
. वेळेचे गणित तंत्रं व मंत्र कोणती?
. स्त्री व पुरुषाचे वेळ व्यवस्थापन वेगळे कसे? हे या पुस्तकात शिकाल.
कांचन दीक्षित या टाइम मॅनेजमेंट व सेल्फ मॅनेजमेंट प्रशिक्षक आहेत. घड्याळाशिवाय वेळ व्यवस्थापन व स्व-व्यवस्थापन करून जगणं सुंदर, सजग व अर्थपूर्ण कसं करावं याचं आजवर एक हजाराहून अधिक व्यक्तींना त्यांनी प्रशिक्षण दिलं आहे. वेळ नावाची अमूल्य गोष्ट तसं बघायला गेलं तर आपल्यासाठी अक्षरशः फुकट उपलब्ध असते. त्यामुळेच कदाचित आपण तिचं महत्त्व जाणत नाही. वेळ का महत्त्वाचा आहे आणि दैनंदिन जीवनात त्याचा विनियोग आपण जर सजगतेने केला तर भौतिक आणि मानसिक पातळीवर आपण अतिशय सकारात्मक परिणाम कसे मिळवू शकतो याचा वस्तुपाठ हे पुस्तक देतं. दीक्षितांनी वेळेचं व्यवस्थापन करताना आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं, याच्या अनुकरणीय गोष्टी सांगितल्या आहेत. युवा ते वृद्ध, नोकरदार ते व्यावसायिक, स्त्री-पुरुष अशा सर्वांसाठीच हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
राजेश मंडलिक सीईओ व एमडी सेटको स्पिंडल्स इंडिया प्रा.लि.