Shodh Bhartacha By Javaharlal Neharu, Savita Damle(Translator) शोध भारताचा
Shodh Bhartacha By Javaharlal Neharu, Savita Damle(Translator) शोध भारताचा
“शोध भारताचा या पुस्तकातून एका महान देशाच्या गौरवशाली अशा
बुद्धिमंत आणि आध्यात्मिक परंपरेचे वाचकांना आकलन होते. “
–
• अल्बर्ट आईन्स्टाईन
अहमदनगरच्या किल्ल्याच्या तुरुंगात ५ महिन्याहून अधिक काळ अटकेत
असताना शोध भारताचा या अभिजात ग्रंथाचे लेखन पंडित जवाहरलाल नेहरू
यांच्याहातून झाले. या पुस्तकाचे प्रकाशन सर्वप्रथम १९४६ साली झाले होते.
या ग्रंथाचा आवाका अफाट आहे आणि विद्वत्ता विलक्षण आहे. भारताच्या
इतिहासातील एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या समृद्ध आणि गुंतागुंतीच्या
भूतकाळाचे विहंगमदृश्यच या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे. लिखितपूर्व
इतिहासकाळापासून ते ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या शेवटच्या काळापर्यंतचा
इतिहास यात त्यांनी मांडला आहे. वेद, अर्थशास्त्रासारखे ग्रंथ आणि गौतम बुद्ध,
महात्मा गांधींसारखी व्यक्तिमत्त्वे यांच्यावर त्यात विश्लेषणात्मक भाष्य केले असून
आपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः एक पुरातन संस्कृती सजीव केली आहे. याच
देशात तत्त्वज्ञान विज्ञान आणि कलाक्षेत्रातील काही जागतिक महान परंपरा
उमलल्या होत्या. जगातले बरेचसे मुख्य धर्मही येथेच उदयास आले होते.
नेहरूंची तेजस्वी बुद्धिमत्ता, त्यांच्या मनातील माणुसकीचा खोल झरा आणि
सुबोध – प्रवाही लेखनशैली यांच्यामुळे शोध भारताचा हा ग्रंथ वाचनीय होतो.
ज्या-ज्या कुणाला भूतकालीन आणि वर्तमान भारत जाणून घेण्याची इच्छा आहे
अशा सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.