Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
“शोध भारताचा या पुस्तकातून एका महान देशाच्या गौरवशाली अशाबुद्धिमंत आणि आध्यात्मिक परंपरेचे वाचकांना आकलन होते. “–• अल्बर्ट आईन्स्टाईन
अहमदनगरच्या किल्ल्याच्या तुरुंगात ५ महिन्याहून अधिक काळ अटकेतअसताना शोध भारताचा या अभिजात ग्रंथाचे लेखन पंडित जवाहरलाल नेहरूयांच्याहातून झाले. या पुस्तकाचे प्रकाशन सर्वप्रथम १९४६ साली झाले होते.या ग्रंथाचा आवाका अफाट आहे आणि विद्वत्ता विलक्षण आहे. भारताच्याइतिहासातील एका महान व्यक्तीने आपल्या देशाच्या समृद्ध आणि गुंतागुंतीच्याभूतकाळाचे विहंगमदृश्यच या ग्रंथाद्वारे आपल्यासमोर उलगडले आहे. लिखितपूर्वइतिहासकाळापासून ते ब्रिटिश वसाहतवादी सत्तेच्या शेवटच्या काळापर्यंतचाइतिहास यात त्यांनी मांडला आहे. वेद, अर्थशास्त्रासारखे ग्रंथ आणि गौतम बुद्ध,महात्मा गांधींसारखी व्यक्तिमत्त्वे यांच्यावर त्यात विश्लेषणात्मक भाष्य केले असूनआपल्या डोळ्यांसमोर अक्षरशः एक पुरातन संस्कृती सजीव केली आहे. याचदेशात तत्त्वज्ञान विज्ञान आणि कलाक्षेत्रातील काही जागतिक महान परंपराउमलल्या होत्या. जगातले बरेचसे मुख्य धर्मही येथेच उदयास आले होते.नेहरूंची तेजस्वी बुद्धिमत्ता, त्यांच्या मनातील माणुसकीचा खोल झरा आणिसुबोध – प्रवाही लेखनशैली यांच्यामुळे शोध भारताचा हा ग्रंथ वाचनीय होतो.ज्या-ज्या कुणाला भूतकालीन आणि वर्तमान भारत जाणून घेण्याची इच्छा आहेअशा सर्वांनी हे पुस्तक वाचलेच पाहिजे.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books