Aaharvata By Anjali Prabhune
Aaharvata By Anjali Prabhune
Couldn't load pickup availability
आपल्या स्वास्थ्याबाबत-आरोग्याबाबत गंभीर व्हा! अजूनही उशीर झालेला नाही. आपल्याला निरोगी, दीर्घायुषी आयुष्य जगायचे असेल, तर आणि तरच तुम्ही, तुमच्यातील संपूर्ण चैतन्यशक्तीचा-ऊर्जेचा नेमका विनियोग करू शकाल !चैतन्य हे एक प्रकारे तारुण्यच असते. खाण्यावर-शारीरिक नियंत्रणावर, आपले लक्ष केंद्रित करा. आपल्या मनाशी, शरीराशी, हृदयाशी नव्याने नाते आपल्याला जोडायचे आहे. प्रस्तुतचे आहारवाटा हे पुस्तक केवळ तुमच्यासाठीच आहे. अन्नपदार्थाची गुणवत्ता, त्याचे प्रमाण व त्यामुळे होणारे शरीराचे परिणाम या दृष्टीने अन्नपदार्थाचा विचार अंजली प्रभुणे, आहार तज्ज्ञ यांनी अतिशय काळजीपूर्वक व मोठ्या आस्थेने या पुस्तकात केला आहे. गेली २७ वर्षे त्या एका उच्चतम ख्यातकीर्त हॉस्पिटलमध्ये आहारतज्ज्ञ आणि विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. तरुणांपासून ज्येष्ठ नागरिक, मधुमेह रुग्ण, पोलिसदल यांच्यापर्यंत सर्वांना त्या आहारविषयक मार्गदशर्न व सल्ले देत असतात. प्रसुतीपूर्व आणि प्रसूतीनंतर घ्यावयाची काळजी, ही त्यांची पुस्तिका या अगोदरच प्रसिद्ध झालेली आहे. विविध कार्यशाळा, व्याख्याने, लेख यातून त्या मार्गदर्शन करीत असतात. आजवर महाराष्ट्र टाईम्समधून त्यांचे आहार व आरोग्य विषयक ७० हून अधिक लेख प्रसिद्ध झाले आहेत.
Share
