Skip to product information
1 of 1

Kamala Harris By Hansa Makhijani Jain, S. V. Patvardhan(Translators) (कमला हॅरिस)

Kamala Harris By Hansa Makhijani Jain, S. V. Patvardhan(Translators) (कमला हॅरिस)

Regular price Rs. 191.00
Regular price Rs. 225.00 Sale price Rs. 191.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

कमला, बर्‍याच महान गोष्टी करणारी कदाचित तू पहिलीच महिला असशील, पण एवढं नक्की बघ कीतू शेवटची असणार नाहीस. - श्यामला हॅरिस.

 

जो बायडेन या अमेरिकन राष्ट्रपतींच्या निवडणुकीच्या उमेदवारांनी जेव्हा सिनेटर आणि अ‍ॅॅटर्नी असलेल्या कमला हॅरिस यांची त्यांचे सहकारी म्हणून निवड केली तेव्हा सर्व जगाचं लक्ष त्यांच्याकडे वेधलं गेलं. देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच असं होणार होतं की एक कृष्णवर्णीय-आशियायी महिला जगातील सर्वात शक्तिशाली सभागृहामध्ये महत्त्वपूर्ण पदासाठी उमेदवार म्हणून घोषित झाली होती. जेव्हा डेमोक्रॅटिक पार्टी जिंकली तेव्हा युनाइटेड स्टेट्सच्या उपाध्यक्ष पदावर त्यांची नियुक्ती झाली. बायडेन यांनी जेव्हा ही घोषणा केली तेव्हापासून लोकांच्या मनामध्ये कित्येक प्रश्न उपस्थित झाले. असंं काय झालं की ज्यामुळे या पदासाठी कमला हॅरिस या योग्य उमेदवार ठरल्या? त्या त्यांच्या या असामान्य यशाचं श्रेय आपल्या आईला का देत असतील? सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड उत्सुकतेने भरलेल्या आणि ध्रुवीकरणाचा प्रभाव असलेल्या या अटीतटीच्या निवडणुकीमध्ये लोकांच्या आणि देशाच्या अपेक्षांमध्ये त्या खर्‍या कशा उतरल्या? कमला हॅरिस - भारतात सुरू झालेली अमेरिकन कथा, या पुस्तकामध्ये साहसी आणि करिष्मा असणार्‍या महिलेची प्रेरणादायी कथा आहे. राजकारणामध्ये असूनही आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरीही त्यांनी आपली तत्त्वं जपली. हॅरिस या स्वतः प्रभावी नेता आहेत ज्यांनी लोकांसमोर एक नवीन पायंडा पाडला आहे. कित्येक लोकांसाठी त्या आदर्श ठरत आहेत. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन कित्येक जण त्यांच्यासारखं महान यश संपादन करतील यात शंकाच नाही. त्यामुळे या प्रकारचं यश प्राप्त करणार्‍या त्या पहिल्या महिला असल्या तरीही शेवटच्या नक्कीच नसतील.

View full details