Skip to product information
1 of 3

Set Of 3 Books Tata Ek Vishwas + Tatayan +Ratan Tata By Madhav Joshi,Girish Kuber,Sudhir Sevekar

Set Of 3 Books Tata Ek Vishwas + Tatayan +Ratan Tata By Madhav Joshi,Girish Kuber,Sudhir Sevekar

Regular price Rs. 892.00
Regular price Rs. 1,050.00 Sale price Rs. 892.00
15% OFF Sold out
Shipping calculated at checkout.

टाटा एक विश्वास 
एखादा उद्योग उभा करतांना त्यातून नफा कमवत संपत्ती निर्माण करणं हाच त्या उद्योजकाचा प्रधान हेतू असतो. पण १६० वर्षांपूर्वी भारतीय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवताना जमशेटजी टाटा यांच्या पुढे आपल्या भारत देशाला समृद्ध व वैभवशाली बनविण्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचं उदात्त ध्येय होतं हे त्यांचं वेगळेपण आहे.. संपत्ती निर्माण करायची ती राष्ट्रासाठी आणि यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं आणि त्यातूनच पुढे जाऊन टाटा उद्योग समूह बनला.

टाटायन 
'टाटा, भारतीयांसाठी ही केवळ दोन अक्षरं नाहीत. त्यांच्यासाठी ते आहे लक्ष्मीचं दुसरं नाव. सचोटीच्या, विश्वासाच्या भक्कम पायावर उभी राहिलेली, सव्वाशे वर्षांची मूल्याधिष्ठित परंपरा लाभलेली, पाच पिढ्यांनी परिश्रमपूर्वक जोपासलेली भारताची निरलस उद्यमशीलता म्हणजे टाटासंस्कृती. टाटांनी केलेली संपत्तिनिर्मिती म्हणजे लक्ष्मी-सरस्वतीचा संगम. सालंकृत तरीही सात्त्विक. ऐश्वर्यवंत तशीच नीतिमंत. जमशेटजी आणि दोराबजींपासून जेआरडी आणि रतन टाटांपर्यंत सा-यांच्या कर्तबगारीनं सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच टाटायन!'

रतन टाटा 
सुमारे १५० वर्षांच्यी उद्योग परंपरा असलेल्या टाटा ग्रुपचा य होणे हा खऱ्या अर्थाने काटेरी मुकुट आहे. ही जबाबदारी यशस्वीरीत्या पेलताना रतन टाटा यांनी दाखविलेला निर्णायक खंबीरपणा आणि मानसिक कठोरता या बाबी टाटा ग्रूपला वेगळ्या उंचीवर घेऊन गेला. रतन टाटा यांनी अतिशय कुशलतेने आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या कंपन्या टेकओव्हर करतानाच माहिती तंत्रज्ञानाच्या नव्या क्षेत्रांत दमदारपणे आघाडी घेतली. टाटा ग्रूपची विश्वासार्हता जपत त्यांनी टाटा ग्रूपचा विस्तार केला.

View full details