Scientist khopdi By Dr. Nitin Hande (सायंटिस्ट खोपडी)
Scientist khopdi By Dr. Nitin Hande (सायंटिस्ट खोपडी)
“सायंटिस्ट खोपडी” हे पुस्तकाचं नाव वाचून तुम्हाला कदाचित नवल वाटलं असेल. जेव्हा आपण शाळेमध्ये शिकत असतो तेव्हा वर्गामध्ये अशी एकदोनच मुलं असतात, जी वैज्ञानिक प्रकल्प तयार करण्यामध्ये उत्साहानं भाग घेतात. बॅटरी, मीटर, वायर, कार्डबोर्डचे तुकडे आणि इतर कायकाय पार्ट जोडून नवलाईच्या वस्तू बनवतात. या वस्तू कशा तयार झाल्या हे ज्यांना रामजत नाही, ते या हुशार मुलांना “सायंटिस्ट खोपडी” असं चिडवतात. मात्र या सायंटिस्ट खोपडी असलेल्या मुलांनी विशेष काही केलेलं नसतं; विज्ञानाचे बेसिक फंडे वापरून आणि त्याला कल्पनाशक्तीची जोड देऊन त्यांनी या वस्तू बनवलेल्या असतात. मुळात सायंटिस्ट खोपड़ी असं निसर्गानं काही बनवलेलं नसतं. व्यक्तीची जडणघडण, तिचं भवताल, तिला उपलब्ध संधी आणि संधी उपलब्ध नसेल तर ती मिळवण्यासाठी संघर्ष करायची तिची तयारी यातून तिचं व्यक्तिमत्त्व साकार होत असतं. पुढच्या पिढीला असा संघर्ष करायची प्रेरणा मिळावी आणि त्यातून नवीन सायंटिस्ट खोपड्या तयार व्हाव्यात यासाठी हे पुस्तक आपल्यासमोर सादर करत आहे…