Aple Bhavtal By Dr. Nitin Hande (आपले भवताल)
Aple Bhavtal By Dr. Nitin Hande (आपले भवताल)
गुहेत राहणाऱ्या आदिमानवापासून तर आजच्या स्मार्टफोन वापरणाऱ्या स्मार्ट मानवापर्यंत मानवाने जी प्रगती केली आहे, कारण त्याला वेळोवेळी प्रश्न पडले त्याची त्याने उत्तरे शोधली. पाऊस का पडतो? विजा का चमकतात? प्रश्न पडत गेले आणि उत्तरे देखील सापडत गेली. तर्क, निरीक्षण, प्रयोग, अनुमान आणि प्रचिती या सर्वांचा वापर करत करत त्याने नवीन नवीन शोध लावले. म्हणजेच माणसाचा इतिहास हा प्रश्न पडण्याचा इतिहास आहे. न्यूटनच्या डोक्यावर सफरचंद पडले त्यावेळेस त्याला प्रश्न पडला की ते खालीच का पडले…. या प्रश्नातूनच गुरुत्वार्षण नियम मांडला गेला. चिकित्सा हीच खरी शोधाची जननी आहे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. प्रश्न विचारण्याची संस्कृती जोपासली पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन आपण स्वतः समजून घेऊन इतरांना सांगितला पाहिजे. आपले भवताल हा त्यासाठीचा छोटा प्रयत्न आहे. लोकांना प्रश्न पडावे, त्याची त्यांनी उत्तरे शोधावी, एकमेकांत चर्चा करावी, ही अपेक्षा ठेवून हे पुस्तक आपल्या हाती देत आहोत.