Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
हिंदी चित्रपटसृष्टीतलं उत्स्फूर्त संगीताचा आविष्कार असणारं हरहुन्नरी व्यक्तिमत्व म्हणजे किशोर कुमार. एक मनस्वी हळवा माणूस लपला होता त्याच्यात. ‘आ चल के तुझे मैं ले के चलूं’ गाण्याचा गीतकार किशोर‘कोई हमदम न रहा’ गाण्याचा संगीतकार होता. ‘मैं हुं झुम झुम झुमरू’ गाणारा किशोर ‘दुखी मन मेरे’सारखी दर्दभरी गाणी तितक्याच तन्मयतेनं गायचा. या पुस्तकात रसिक कला आस्वादक सुहास किर्लोस्करआपल्याला सांगताहेत किशोर कुमार नावाच्या अष्टपैलू गायकाबद्दल. कसा होता किशोर गायक म्हणून? काय होत्या त्याच्या खासियती? सिनेसृष्टीत त्याला कसं झगडावं लागलं? या रसदार कथनानंतर वाचायला मिळतील किशोरची निवडक पंचवीस गीतं आणि त्यांचं रसग्रहण... ते वाचून तुम्हाला मूड येईलच, तेव्हा प्रत्येक गीतानंतर दिलाय त्याचा क्यूआर कोड. तो स्कॅन करा नि गाणं ऐकण्याचा आस्वादही घ्या..
मोहम्मद रफींचं नाव घेतलं अन् त्यांची एकाहून एक सरस नि सुरस गाणी आठवली की सद्गुणांना सुगंधी स्वर लाभला होता असं वाटल्याशिवाय राहत नाही ! पुरुषी स्वर, पण त्याला होती जितकी ऐट तितकीच अदब.. प्रेम, छेडछाड, प्रेमभंग, विफलता, उद्वेग, नटखटपणा, शुद्ध भक्ती आणि अशा असंख्य भावछटा, रफी-स्वरातून सारख्याच सहजपणे नि कुशलतेनं उमटल्या... रसिकांना नाना रसांच्या वर्षावात आजपर्यंत चिंब भिजवत राहिल्या.. म्हणून तर रफी ठरले नवरसांचे जादूगार ! संगीताच्या जाणकार नि प्रसिद्ध गायिका डॉ. मृदुला दाढे या पुस्तकात सांगतायत, रफींच्या आवाजातल्या जादूचं रहस्य ! अन् त्यानंतर आहेत रफींची निवडक पंचवीस गाणी आणि त्यांचं रेशमी रसग्रहण...
क्यूआर कोड स्कॅन करून ती गाणी लगेच ऐकायची सुविधाही आहे..
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books