Skip to product information
1 of 2

Te Aabhal Bhishmach Hote By Ashok Samel

Te Aabhal Bhishmach Hote By Ashok Samel

Regular price Rs. 850.00
Regular price Rs. 1,000.00 Sale price Rs. 850.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

पितामह भीष्माचार्यांच्या चरित्राचा आणि चारित्र्याचा इतका विस्तृत, मूलगामी आणि मर्मग्राही धांडोळा मराठी वाङ्मयात प्रथमच यथासांग चित्रित करण्याचे महत्कार्य ‘ते आभाळ भीष्माचंच होतं...!' या महा-कादंबरीच्या मिषाने अशोक समेळ यांनी व्रतस्थपणे केले आहे. भीष्म हे स्वतः एक तारांकित असे आभाळ होते...! ताऱ्यांनी खच्चून भरलेले निगम अंतराळ होते... ! नि त्या अंतस्थ अंतराळात ध्रुव ताऱ्यासारखा अढळ कर्मयोगी, निःसंग पुरुषार्थी व निरामय आर्ती असलेला पितामह भीष्माचार्यांचा कधीही निस्तेज न होणारा तेज:पुंज दीपस्तंभ आहे...! महाभारताच्या परिघाचा हा घनमध्य मानबिंदू म्हणजे ताण-तणावांनी भारलेला ‘देवव्रत’; महापराक्रमी, दार्शनिक तत्त्वज्ञानी, महारथी कोदंडधारी परशुराम शिष्य... पितामह भीष्माचार्य...! की ज्यांच्या नावावरून 'भीष्म-प्रतिज्ञा' ही शब्दसिद्धी चिरकालासाठी अखिल संस्कृतीत दृढमूल झाली आहे. भारतीय संस्कृतीचा झगमगता इतिहास भीष्माचार्यांना टाळून पुढे जाऊच शकत नाही, हे केवळ एकमेवद्वितीय सत्य आहे...!! या सर्व महाकालपटाचा वेध आणि निर्वेध घेताना श्री. अशोक समेळ यांनी आपली तपश्चर्या फळाला लावली यात शंकाच नाही...! व्यामिश्र कथेतून भीष्माचार्यांचा दीपस्तंभ उजळत ठेवताना त्यांनी जे भाषिक पालाण घातले आहे त्याला तोड नाही. अशोक समेळ यांनी नाट्यात्मक संवाद, कथानकाचा कालपट, सघनसार्थ भाषा व भीष्माचे तरलतम अंतरंग या चार दिग्गजांवर पेललेले हे भीष्मांचे आभाळ आहे...! शेवटी रंगातून अंतरंगाकडे जाणे हे नाटक आणि अंतरंगाचे आत्मिक विविध रंगदर्शन करते ती महा- कादंबरी...! ‘ते आभाळ भीष्माचंच होतं...!' या महा-कादंबरीचे रसिकांच्या मनोपंजरी स्थित असण्याचे चिरंजीवित्व हेच भागधेय आहे...!!

View full details