Parikrama mandeshchi By Dilip Mote (परिक्रमा माणदेशची)
Parikrama mandeshchi By Dilip Mote (परिक्रमा माणदेशची)
हजारो वर्षापासून माणदेश हा पाण्यापासून वंचित असलेला भूभाग. इथल्या मातीची तृष्णा रामायण महाभारतापासून तशीच राहिली. इथल्या माणसांच्या सोबतीने वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या खिलार जनावरांनीही दुष्काळाची टोळधाड कायम अंगावर घेतली आहे. खिलार कालवडीचा प्रवास ही एक सत्यकथा असून माणदेशातून आणलेली खिलार कालवड मराठवाड्याच्या वेगळ्या मातीत, वेगळ्या माणसात, वेगळ्या संस्कृतीत अन् वेगळ्या जनावरात रमली नाही. ती वेगवेगळ्या कारणांसाठी दावणी बदलत राहीली पण शेवटी तिची परिक्रमा माणदेशी मातीत येऊनच थांबली.. कथेच्या गरजेसाठी स्थळ, वेळ, काळ आणि नाव यांचा एकत्रित मेळ घातला आहे. यामध्ये कुणाच्या भावना दुखावण्याचा हेतू नसून, माणदेशचा संघर्ष दाखवण्याचा प्रयत्न आहे. कालवडीची गाई होते, माणदेशाला कृष्णेचं पाणी येतं. कळीकाळ चित्रासोबत माणसांचीही परिक्रमा घडवतो. त्या सर्वांसाठी 'परिक्रमा माणदेशची.''