When By Daniel H. Pink, Prasad Dhapare(Translator) (कधी)
When By Daniel H. Pink, Prasad Dhapare(Translator) (कधी)
न्यूयॉर्क टाइम्स बेस्टसेलर आश्चर्यचकित करणाऱ्या रहस्यांनी आणि व्यवहारोपयोगी सल्ल्यांनी परिपूर्ण पुस्तक - द वॉल स्ट्रीट जर्नल कोणती गोष्ट कधी करावी याचं एक शास्त्र आहे, ज्याला टायमिंग असं म्हणतात. परफेक्ट टायमिंग फार महत्त्वाचं आहे. आपल्याला कोणती गोष्ट कधी करावी याविषयी आयुष्यभर निर्णय घ्यावे लागतात. जसं की, व्यवसाय, नोकरी, शाळा इ. मध्ये कोणती मीटिंग, कोणतं काम तसंच कोणता प्रस्ताव कधी मांडावा. पण या 'कधी'चं म्हणजेच टायमिंगचं महत्त्व माहिती नसल्यामुळे कित्येक वेळेला अपेक्षित निर्णय मिळत नाहीत. डॅनियल एच. पिंक यांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत, ज्यात न्यूयॉर्क टाईम्सचे बेस्टसेलर व्हेन, द ड्राइव्ह टू सेल इज ह्यूमन आणि अ होल न्यू माइंड यांचा समावेश आहे. त्यांच्या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत आणि तेहतीस भाषांमध्ये अनुवादित झाले आहेत. 'क्राउड कंट्रोल' या टेलिव्हिजन मालिकेचे ते होस्ट आणि सह-कार्यकारी निर्माता आहेत. एनपीआर आणि पीव्हीएस अशा कार्यक्रमांमध्ये पिंक वारंवार दिसतात.
* टायमिंगचं शास्त्र * तुमचं जैविक घड्याळ कसं चालतं ? * समूह टायमिंगचं महत्त्व आणि शक्ती * भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळाच्या टायमिंगचं महत्त्व * मुंबईचे प्रशिक्षक कोणते फॉर्म्युला वापरतात? * डुलक्या घेणं किती महत्त्वाचं आहे ? * हरत असलेले संघ अचानक कसे जिंकतात ?