Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
सागरी सुरक्षेस वारंवार त्रासदायक ठरणाऱ्या, सर्व नाही तरी अनेक, एकूणच कायदेशीर गुंतागुंतीची माहिती ब्रिगेडिअर महाजन ह्यांनी इथे स्वतःहून संकलित केलेली आहे. हे श्रेय त्यांचेच आहे. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायद्यांचे हे गुंतागुंतीचे मिश्रण आणि जमिनीवर राहू शकतात तितके ते सुटे करण्यातील पर्यायी अंगभूत अडचणी, ह्यांमुळे भारतीय सागरी सुरक्षा बहुविध संस्थांकडून सांभाळली जावी लागते. मात्र तिचे नियंत्रण आणि समन्वयन एकाच अशा संस्थेकडून व्हावे लागते, जिचे अधिकारक्षेत्र आणि कर्तव्य प्रादेशिक पाण्यापासून तर खोल समुद्रापर्यंत विस्तारलेले असते. म्हणूनच भारत सरकारने सागरी सुरक्षेची एकूण जबाबदारी भारतीय नौदलास दिलेली आहे, हे योग्यच आहे. कारण, देशाच्या सागरी सुरक्षेचे पर्याय भारतीय नौदलाच्या समुद्रावरील प्रमुख लष्करी सामर्थ्य- सज्जतेस पूरकच असून त्यास विरोध करणारे नाहीत. वर्तमान शतकाच्या सुरुवातीच्या दशकांतून आपण पार होत असताना, अपुरी सागरी सुरक्षा भारतास धोकेदायक ठरेल. ब्रिगेडिअर महाजनांचे पुस्तक, व्यवहार्य व संभवनीय कृतीयोग्य मुद्दयांनी भारित असल्याने, ह्या धोक्यांचा हानिकारक प्रभाव घटवण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण प्रयास ठरले आहे. अशा प्रकारे हे पुस्तक भारताच्या सागरी सुरक्षेचे नियोजन, कायदेनिर्मिती, समन्वयन, अंमलबजावणी व अंमलनिश्चिती करणाऱ्या सर्व संबंधितांच्या ज्ञानात मोलाची भर घालणारे आहे. - व्हाईस ॲडमिरल प्रदीप चौहान ए. व्ही. एस. एम. अँड बार, व्ही. एस. एम., भारतीय नौदल (निवृत्त)
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books