Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)
नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी
Your cart is empty now.
१९८४’ आणि ‘ॲनिमल फार्म’ या जगप्रसिद्ध कादंबऱ्यांचा लेखक जॉर्जऑर्वेल मृत्यू पावला, त्याला आता सत्तर वर्षे उलटून गेली आहेत. मात्र त्याच्याकादंबऱ्यांमधून त्याने रेखाटलेले भविष्यातील मानवी समाजाविषयीचे भयस्वप्नआता वास्तवात उतरते आहे की काय, अशा भीतीने विचारी जगाला ग्रासलेआहे. आणि म्हणून गेल्या काही वर्षात ऑर्वेलची आठवण समकालीनलोकसंस्कृतीत पुन्हा एकदा जागृत झाली आहे. देशोदेशींच्या अधिकारशहांनीलोकशाही मार्गातून ऑर्वेलच्या भयस्वप्नाच्या दिशेने प्रयास सुरू केलाअसतानाच्या या काळात ऑर्वेलचे स्मरण अपरिहार्य ठरावे.• राजेश्वरी देशपांडे,–राज्यशास्त्राच्या प्राध्यापक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठअॅनिमल फार्म‘टाइम’ मॅगझिनने निवडलेल्या इंग्रजी भाषेतील १०० सर्वोत्तमकादंबऱ्यांमधील एक आणि विसाव्या शतकातील राजकीय उपहासात्मकसर्वाधिक प्रसिद्ध कादंबरी.शेतात काम करणाऱ्या प्राण्यांनी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या माणूसमालकाविरुद्ध केलेले बंड आणि त्यानंतर त्यांच्यापैकीच एका जमातीनेत्यांच्यावर केलेले अत्याचार हा एक जागतिक इतिहास आहे.रशियन क्रांतीने पूर्ण न केलेल्या वचनापासून जॉर्ज ऑर्वेल या कादंबरीचीसुरुवात करतो. मग अतिशय कडवट दृष्टिकोनातून एक भविष्य उभे करतोआणि आपल्या सामाजिक आणि राजकीय कृतींचे काय भयानक परिणामहोऊ शकतात, याचे अतिशय स्पष्ट चित्र आपल्यासमोर सादर करतो.जोनाथन स्विफ्टशी ताकद, कारागिरी आणि नैतिक अधिकार याबाबतीतबरोबरी करू शकेल अशा फार थोड्या आधुनिक उपहासकारांमध्ये ऑर्वेलचेनाव घ्यावे लागेल. ‘ॲनिमल फार्म’मधील मोजके लेखन आणि कडवटविनोदामागील तर्कशुद्ध विचार त्याच्या सडेतोड संदेशालाअधिक चमकदार बनवतात.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books