The Old Man And The Sea (Marathi) + Paraka (द ओल्ड मॅन अँड द सी | परका)
The Old Man And The Sea (Marathi) + Paraka (द ओल्ड मॅन अँड द सी | परका)
1) The Old Man And The Sea (Marathi) - The Old Man and the Sea (Marathi). साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळालेली लघुकादंबरी 'आशा न करणं मूर्खपणाचं आहे, ते पाप आहे असं त्याचं म्हणणं होतं.' हवानाच्या गल्फ स्ट्रीम किनाऱ्यावर घडणारी ही कथा. हेमिंग्वेची ही उत्कृष्ट कथा आहे एक म्हातारा, एक लहान मुलगा आणि एक महाकाय मासा यांची कहाणी. या कमालीच्या शौर्यकथेने हेमिंग्वेला साहित्याचे नोबेल पारितोषिक मिळवून दिले. पंचमहाभूतांनी माणसासमोर उभ्या केलेल्या आव्हानाचे, त्यातल्या सौंदर्याचे आणि दुःखाचे एक अद्वितीय आणि कालातीत वर्णन म्हणून या कादंबरीचा उल्लेख करावा लागेल...
2) Paraka -फ्रेंचांची वसाहत असणारा १९३०-४०च्या दरम्यानचा उत्तर आफ्रिकेतला अल्जीरिया देश. त्याची राजधानी अल्जीअर्स या अल्जीअर्समध्ये राहणाऱ्या मेर्सोच्या आईचं निधन होतं. मेर्सो तिच्या दफनविधीला उपस्थित राहतो. नंतर मेर्सोच्या आयुष्यात कमी- अधिक व्याप्तीच्या अनेक घटना घडत राहतात. काही घटनांना तो नुसता साक्षी असतो, तर काही घटनांमध्ये त्याचा प्रत्यक्ष सहभाग असतो. दरम्यान, ऊन, आजूबाजूचे आवाज, माणसं, गाड्या हे सगळं त्याला जाणवत राहतं. मग समुद्रकिनारी त्याच्या हातून खून होतो. त्याच्या विरोधात खटला उभा राहतो. हे सगळं कसं होत जातं? खून का होतो? खटल्यात काय होतं? या सगळ्याची गोष्ट खुद्द मेर्सोच्या तोंडून सांगणारी 'परका' ही आल्बेर काम्यू यांची कादंबरी फ्रेंच भाषेत 'लेत्रांजे' म्हणून १९४२ साली प्रसिद्ध झाली. इंग्रजीत 'द आउटसायडर' म्हणून तिचं भाषांतर झालं. १९५७ साली साहित्यासाठी नोबेल पुरस्कार मिळालेल्या आल्बेर काम्यू यांची ही कादंबरी वेळोवेळी कौतुकाचा, टीकेचा, चिकित्सेचा विषय होत राहिली आहे. तिच्या प्रकाशनाला ऐंशी वर्षं झाली असली, तरी आजसुद्धा ही कादंबरी वेगवेगळ्या अर्थांना वाव देणारी ठरावी.