Asha Kavthekar 3 Book set (
Asha Kavthekar 3 Book set (
1.Steve Jobs- 250
परफेक्शनिस्ट, उत्कृष्ट लीडर, मार्केटिंगची सखोल जाण असणारा, सर्वोत्कृष्ट डिझायनर, जे सर्वोत्तम आहे ते करण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजणारा, डबघाईला आलेल्या कंपनीला नंबर एकची कंपनी बनवणारा, टेक जिनियस... तो म्हणजे, 'अॅपल'चा संस्थापक स्टीव्ह जॉब्स. खरंतर स्टीव्ह जॉब्स आपल्यातून निघून गेला त्यालाही आता १३ वर्षांहून अधिक काळ उलटून गेला आहे. पण त्याने दिलेल्या प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष धड्यांच्या आधारावरच अॅपल ब्रँड आजही आपला क्रमांक एक टिकवून आहे. त्याच्या प्रत्येक निर्णयामुळे, त्याच्या सर्वोत्कृष्टतेच्या अट्टाहासामुळे, त्याच्या जीवतोड मेहनतीमुळेच अॅपल ही कंपनी नावारूपास आली आहे. लोकांची अभिरुची जपणारी कंपनी निर्माण करणारा अवलिया तंत्रज्ञान, नावीन्य आणि उत्पादन विकासातील कर्तृत्वामुळे जगावर कायमस्वरूपी प्रभाव अॅपलच्या २१२ वेगवेगळ्या पेटंट्समध्ये 'संशोधक' म्हणून नाव. तंत्रज्ञान उद्योगात एकमेव लाईफस्टाईल कल्पनाशक्ती, सर्जनशीलता आणि सर्वोत्कृष्टतेच्या जोरावर ब्रँडनिर्मिती
2. इलॉन मस्क (Elon Musk)- 175/-
मंगळावर मानववस्ती निर्माण करण्याचं एक अनोखं ध्येय या अवलियाने समोर ठेवलं. जिद्द, प्रचंड मेहनत, दूरदृष्टी आणि नवनिर्मितीच्या जोरावर जग बदलवणाऱ्या गोष्टींची निर्मिती केली. स्पेसएक्स, टेस्ला, हायपरलूप, न्यूरालिंकसारख्या कंपन्यांच्या माध्यमातून आपल्या ध्येयाला पूरक गोष्टी तयार केल्या. जगातील एक श्रीमंत व्यक्ती बनून लोकांनाही आपल्या ध्येयाच्या मागे धावण्यास प्रेरित करणाऱ्या इलॉन यांचा जीवनप्रवास तुम्हा-आम्हाला नक्कीच प्रेरणादायी आहे.
3.बिल गेट्स (Bill Gates Yashache Aani Shrimantiche Dhade Denare)- 160/-
बिल गेट्स हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी ‘मायक्रोसॉफ्ट’ या जगविख्यात सॉफ्टवेअर कंपनीची निर्मिती केली. एका वेगळ्या क्षेत्रात पाऊल टाकण्याचे धाडस त्यांनी दाखवले, त्यासाठी आवश्यक गुण अंगीकारून आणि प्रचंड मेहनत करून त्यांनी यश मिळवले. केवळ पैसा कमविणे हे एकमेव उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता समाजोपयोगी कार्य करून त्यांनी मानवतावाद जोपासला. त्यांच्या या अभूतपूर्व प्रवासाची कहाणी या पुस्तकात आहे, जी प्रत्येकाला प्रेरणादायी ठरेल.
* जिद्द, चिकाटी, एकाग्रतेचा अभूतपूर्व प्रवास...
* 35 रुपये ते 1 करोड 20 लाख!
* 30 व्या वर्षी बिलेनियर
* आदर्श पती आणि पिताही!
* मानवतावादी बिल गेट्स
* व्यावसायिकतेचे धडे