Skip to product information
1 of 1

Plastic - Varadan Ki Shap By Anil Krushn Kelkar ( प्लॅस्टिक वरदान की शाप )

Plastic - Varadan Ki Shap By Anil Krushn Kelkar ( प्लॅस्टिक वरदान की शाप )

Regular price Rs. 85.00
Regular price Rs. 99.00 Sale price Rs. 85.00
Sale Sold out
Shipping calculated at checkout.

प्लास्टिक! मानवी जीवनातला एक चमत्कार, असं म्हटलं तर वावगं ठरू नये,
इतकं मानवी जीवन प्लास्टिकने सुकर, सुसह्य बनवलं आहे. वीज, उष्णता याचा
दुर्वाहक असणाऱ्या प्लास्टिकने संदेशवहनासह अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल
घडवले. प्लास्टिकच्या शोधामुळे पॅकिंगसह विविध यंत्रात वापरल्या जाणाऱ्या
सुट्या भागांच्या निर्मितीतही मोलाची भर पडली आणि औद्योगिकीकरणाला
गती मिळाली. असं असूनही आज प्लास्टिकचा वापर टाळा असं म्हणण्याची
वेळ आपल्यावर आली आहे.

अशा पार्श्वभूमीवर प्लास्टिकचा उगम, त्याचे प्रकार, त्याचा विविध क्षेत्रातला वापर
आणि अतिरिक्त वापरातून निर्माण झालेला प्लास्टिक प्रदूषणाचा प्रश्न याची माहिती
देणारं हे पुस्तक आपल्या हाती सोपवत आहे. प्लास्टिकचं महत्त्व विषद करण्याबरोबरच
त्याच्या प्रदूषणाबाबत जगभरात काय चालू आहे आणि आपण आपल्या पातळीवर काय
करू शकतो याचंही मार्गदर्शन हे पुस्तक आपल्याला करतं. तेव्हा प्लास्टिकचा वापर
जबाबदारीने करण्यासाठी आणि प्रदूषण विरोधात एक पाऊल पुढे टाकण्यासाठी
शालेय विद्यार्थी, शिक्षक, पालक यांच्यासह सर्वांनी हे पुस्तक वाचायलाच हवं.

Plastic - Varadan Ki Shap | Anil Krushn Kelkar
प्लास्टिक : वरदान की शाप | अनिल कृष्ण केळकर

View full details