Vikram Vetal #physics Chya Junglaat Part 3 By Aniket Anil Kavathekar
Vikram Vetal #physics Chya Junglaat Part 3 By Aniket Anil Kavathekar
* पुस्तक कोणासाठी आहे ?
इ. ८ वी ते ११ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना Electromagnetism शिकवणारे पालक, शिक्षक, क्लासचालक आणि स्वतः विद्यार्थी
* पुस्तक कसे वापरावे?
१. पान क्र. १३ वरील अनुक्रमणिका पहा
२. त्यातील कोणताही धडा निवडा आणि त्या पानावर जा उदा. घडा १ पाहण्यासाठी पान क्र. १६ पहा
३. घड्यातील संकल्पना आपल्या पाल्याला/पाल्यांना माहीत आहेत का ते पहा.
नाही : माहीत नसेल तर संबंधित गोष्टीच्या आधारे तो मुद्दा समजावण्याचा प्रयत्न करावा. आवश्यकतेनुसार गोष्टीत, सदरीकरणात योग्य ते बदल जरूर करावेत.
हो : मुद्दे माहीत असतील तर
१. विद्यार्थ्यांना त्यांच्या पद्धतीने समजलेली संकल्पना मांडावयास सांगा. यात चित्रे, निबंध, विडिओ, ऑडिओ, माती / क्ले / लाकूड / कार्डबोर्ड / पेपर कोलाज / कणिक यांपासून बनलेले मॉडेल, प्रात्यक्षिक / डेमो, संगणक आधारित ग्राफिक्स (Computer Graphics) अशा कोणत्याही पद्धत ज्ञा
समावेश असू शकेल. २. प्रस्तुत तत्व व्यवहारात कुठे वापरले जाते आणि त्याचा काय उपयोग होतो याचा विचार करावा. यात त्या तत्वाला बापरुन बनवलेले मशीन किंवा कोणतीही यंत्रणा (system) असू शकेल. त्या यंत्राच्या किंवा System च्या कार्याचे सादरीकरण मुद्दा १ मध्ये दिलेल्या प्रकटीकरण / सादरीकरण माध्यमाद्वारे करावे.
कोणती खबरदारी घ्यावी ?
* १. विद्यार्थ्याला पुस्तकाप्रमाणेच सांगायचे बंधन, विशिष्ट भाषेत बोलवयाचे बंधन, शुद्ध-अशुद्ध भाषेचे बंधन घालू नका.
२. सादरीकरण किंवा प्रकटीकरण सामुग्री / माध्यम विद्यार्थ्यांच्या पसंतीचेच असू द्यावे.
३. सादरीकरण / प्रकटीकरणासाठी लागणारी सामुग्री परिसरात सहज उपलब्ध होणारी असावी.
४. पहिल्या प्रयत्नात यश न आल्यास योग्य ती मदत करावी. जाणकार शिक्षकांनी तसे करण्यास प्रेरित करावे.
* यातून काय मिळेल ?
१. विद्यार्थ्यांना संकल्पनाची किती माहिती आहे हे पालकांना/शिक्षकांना कळेल. संबंधित संकल्पना समजावून देण्यात मदत होईल.
२. प्रत्येक संकल्पनेच्या सदरीकरणातून विद्यार्थ्याला आवडीचे सादरीकरण माध्यम मिळेल. रुची निर्माण होईल.