Datta Anubhuti By Anand Kamat (दत्त अनुभूती)
Datta Anubhuti By Anand Kamat (दत्त अनुभूती)
|श्री|| सद्गुरू शरण झाल्यावर काहीही शक्य आहे. या भक्तांनी अकरा वेळा श्री. गिरनार दर्शन घेतले. - त्यांच्या श्रद्धेला माझे प्रणाम. तुम्ही श्रद्धा ठेवा, त्याची पावती मिळतेच हे त्यांनी सिद्ध करून दाखविले आहे. भक्ती फार कसोटीला लावावी लागते. चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे. याचा अनुभव यांनी घेतला. पुस्तक वाचल्यावर इतरांनीही अनुकरण करावे. या सर्वांना माझ्या शुभेच्छा. अवधुतानंद (जगन्नाथ कुंटे)
सोसाट्याचा वारा, रात्रीचे भयाण जंगल, काळजाला चिरणारा भयानक श्वापदांचा आवाज, अशातच गिरनार वारीचा प्रत्यक्ष अनुभव, साक्षात महाराजांच्या आदेशांनुसार 11 गिरनार वारीचा अमूल्य ठेवा, तसेच महाराजांचे अनेक अनुभव झोळीत सांभाळून आणीत अंती साक्षात दत्त महाराजांच्या परवानगीने प्रकाशित केलेले पुस्तक. ‘हम गया नहीं, जिंदा है’ची प्रचिती समस्यांची झळ लागू दिली नाही गिरनारची अविस्मरणीय वारी अघोरी शक्तीही झाली वश अजब पण गजब दर्शन स्वामींनी हट्ट पुरविला प्रचिती दिलीच