Anubhuti Datta Anubhutichi By Anand Kamat (अनुभूती 'दत्त अनुभूती'ची)
Anubhuti Datta Anubhutichi By Anand Kamat (अनुभूती 'दत्त अनुभूती'ची)
बुद्धीच्या पलीकडे घेऊन जाणारे गिरनारीचे भक्तांना आलेले अनुभव ‘दत्त अनुभूती’ या पुस्तकाला कुणी पुस्तक म्हटलं, कुणी ग्रंथ म्हटलं, कुणी पोथी म्हटलं. पण खरं तर ही दत्त महाराजांची लीला आहे. त्यांनी माझ्याकडून ही पुस्तकरूपी सेवा करून घेतली. त्या मागचे उद्दिष्ट, सर्वांनी नामस्मरणाच्या जास्तीत जास्त मार्गी लागावे हेच आहे. ‘दत्त अनुभूती’ हे निमित्त ठरलं, अनेकांच्या आयुष्यात महाराजांची भक्ती, आशीर्वाद आणि अनुभूती प्रकट होण्यासाठी. घराघरात देव्हार्यात स्थान मिळविणारे ‘दत्त अनुभूती’ वाचून अनेकांनी त्यांना आलेले अनुभव मला कळवले, त्यातून हे सिद्ध होते की ‘दत्त अनुभूती’ फक्त माझी किंवा रितेशची नाही, तर ती सर्व साधकांची, सर्व वाचकांची आहे. त्यांचे अनुभव वाचणार्याला कदाचित चमत्कार वाटतील, पण ही महाराजांची अगाध लीला आहे. गेल्या 3 वर्षांत आलेल्या हजारो अनुभूतींमधील निवडक अनुभूती दत्तभक्तांच्या नावासकट आपल्यासमोर मांडण्याची सेवा स्वामी महाराजांनी माझ्याकडून करून घेतली. त्या दत्तस्वरूप स्वामी महाराजांना ही सर्वसामान्यांची अनुभूती अर्पण. त्या सर्व साधकांच्या साधनेला माझा मानाचा मुजरा. - आनंद कामत