Due Courier Holiday Orders with Ship after 5th Nov , Free shipping with orders over ₹ 1499

TOP DIWALI ANK

Rs. 300.00Rs. 255.00
Availability: 47 left in stock

एखादा उद्योग उभा करतांना त्यातून नफा कमवत संपत्ती निर्माण करणं हाच त्या उद्योजकाचा प्रधान हेतू असतो. पण १६० वर्षांपूर्वी भारतीय उद्योगाची मुहूर्तमेढ रोवताना जमशेटजी टाटा यांच्या पुढे आपल्या भारत देशाला समृद्ध व वैभवशाली बनविण्यासाठी संपत्ती निर्माण करण्याचं उदात्त ध्येय होतं हे त्यांचं वेगळेपण आहे.. संपत्ती निर्माण करायची ती राष्ट्रासाठी आणि यासाठी जे जे आवश्यक ते ते सर्व त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केलं आणि त्यातूनच पुढे जाऊन टाटा उद्योग समूह बनला. सचोटी, दर्जा, कामगार कल्याण या सर्व कसोट्यांवर सातत्याने खरे उतरत देशासाठी निर्माण केलेली ही संपत्ती सर्वसामान्य देशवासीयांच्याच उपयोगी पडावी म्हणून ‘टाटा ट्रस्ट’ ची स्थापना करुन या ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवणे हे टाटा समूहाच वैशिष्ट्य आहे. आणि म्हणूनच जमशेटजी ते रतन टाटा या सर्व ‘टाटां’ बद्दल प्रत्येक भारतीयाच्या मनात आदर आणि टाटा उत्पादनांबद्दल विश्वास निर्माण झाला.. ‘टाटा’ हे ‘विश्वासाचे’ जणू प्रतीकच बनून गेले. देशासाठी व देशातील लोकांच्या हितासाठी कार्यरत असणाऱ्या या टाटांची कार्य पद्धती, त्यांचे व्यक्तिगत जीवन याबद्दल सर्वसामान्य भारतीयांच्या मनात कुतूहल आहेच.कॉर्पोरेट क्षेत्रातील अनेक नामवंत देश विदेशातील कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ म्हणून वावरलेले माधवराव गेली बावीस वर्षे टाटा समूहात आहेत, आदरणीय श्री रतन टाटा यांच्या बरोबर त्यांनी जवळून काम केले आहे.यातूनच टाटा समूह, टाटा ट्रस्ट या सर्वांच्या विषयी माधवरावांच्या अनुभवी निरिक्षणातून ‘टाटा एक विश्वास’ हा प्रस्तुत ग्रंथ अक्षरबद्ध झाला आहे.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Tata Ek Vishwas By Madhav Joshi
- +

Recently Viewed

Recently Viewed Books