Due Courier Holiday Orders with Ship after 5th Nov , Free shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
Set Of 2 Books Chhatrapati Shivaji Maharaj Kshatriyakulawant Sadhu
गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळूसकर गेल्या शतकातील एक महान चरित्रकार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठीतील पहिले विस्तृत चरित्र त्यांनी लिहिले. विख्यात चरित्रकार डॉ. धनंजय कीर लिहितात, 'केळूसकरकृत शिवचरित्राएवढे समग्र व सविस्तर चरित्र आजपर्यंत कोणीही लिहिले नाही. तसेच गौतमबुद्ध आणि संत तुकाराम यांचे पहिले चरित्रकारही केळूसकरच आहेत.' राजकीय ऋषी मामा परमानंद, न्यायमूर्ती माधवराव रानडे, महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी गुरुवर्य केळूसकरांच्या लेखणी व विचारांची प्रशंसा केली. ते धर्मशास्त्र, अर्थशास्त्र, शिक्षणशास्त्र, इतिहास आणि तत्त्वज्ञान या विषयांवर ग्रंथ लिहिणारे प्रकांड पंडित होते. पण बहुजनसमाजाच्या लेखकाच्या वाट्याला येणारी फरपट केळूसकरांच्या वाट्याला आली. महाराष्ट्राच्या वाङमयमहर्षीची उपेक्षाच झाली. छत्रपती शिवाजी महाराजांचे साधार प्रदीर्घ चरित्र लिहिताना केळूसकरांनी ऐतिहासिक सत्याच्या आधारे विवेकशील मांडणी केली आहे.
क्षत्रियकुळावंत साधूशिवाजी महाराजांच्या लखलखत्या संघर्षावर आजवर लाखो पुस्तके लिहिली गेली. पण, राजांच्या आयुष्यात असे काही प्रसंग होते ज्यावर कुठेच सविस्तर लेखन झाले नाही. महाराजांचा आग्रा ते राजगड प्रवास हे असेच एक गुढ. आगऱ्यामध्ये औरंगजेबाच्या नजरकैदेत अडकलेले राजे निसटले आणि राजगडावर पोहचले हे सर्वज्ञात. तब्बल चाळीस दिवसांचा प्रवास करुन राजे स्वराज्यात पोहचले होते. या प्रवासात कोणती संकटे आली? राजांनी मार्ग कसा शोधला? चवताळलेल्या औरंगजेबाने कोणती आव्हाने पेरली? मुसळधार पाऊस आणि तुडूंब भरलेल्या नद्या राजांनी कशा पार केल्या? लाखो मुघली सैन्याची भिंत कशी फोडली? अशा हजारो प्रश्नांमध्ये बुडालेली गुढरहस्यं साडेतीनशे वर्षांपासून निपचित पडली होती. याच रहस्यांवरचा पडदा बाजूला करून राजांचा तेजस्वी प्रवास सर्वांसमोर आणण्याचा प्रयत्न म्हणजेच साधू ही कादंबरी.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books