Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 800.00Rs. 680.00
Availability: 50 left in stock

मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे हे माधव गुणाजी कोंडविलकर यांचे दैनंदिनीवजा आत्मकथन. १९६९ ते १९७७ या कालखंडातील अनुभव त्यात मांडले आहेत. कोंडविलकर हे चांभार या अस्पृश्य गणल्या गेलेल्या जातीत जन्माला आल्यामुळे जातीयतेचे भयंकर चटके त्यांना सोसावे लागले. आपल्या कविता, कथा, कादंबरी, आत्मकथन या प्रकारातून त्यांनी दलित, पीडित व उपेक्षित समूहाच्या व्यथा, वेदना व्यक्त केल्या आहेत. माधव कोंडविलकर यांच्यावर चार्वाक, भगवान बुद्ध , महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांच्या विचारांचा प्रभाव आहे. त्यांनी आपल्या साहित्यातून पिढ्यानपिढ्या जातिभेदाच्या भिंतीत अडकलेल्या आणि भिंती तोडून मुक्त होऊ इच्छिणार्‍या दलित, कष्टकरी, श्रमिक वर्गाचे दु:ख मुखर केले आहे. मुंबई व कोकणातील दलित व कामगार वर्गाची होरपळ कोंडविलकरांनी आपल्या लेखनातून तीव्रपणे मांडलेली आहे. कोकणातील या सामाजिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक आणि भौगोलिक परिस्थितीतून कोंडविलकरांचे मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे  हे आत्मकथन आकाराला आले आहे. प्रथम ते १९७७ मध्ये तन्मयच्या दिवाळी अंकात छापले गेले. चांभार समाजातील रीतीरिवाज, श्रद्धा – अंधश्रद्धा, रूढी-परंपरा, व्यसनाधीनता यावर त्यांनी मार्मिक भाष्य केले आहे. चर्मकार समाजातील आर्थिक दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, आपापसातील वादविवाद याचे प्रत्ययकारी वर्णन कोंडविलकरांनी केले आहे. या आत्मकथनात लेखकाने कौटुंबिक दारिद्र्याचे, संघर्षाचे, भुकेचे आणि व्यावसायिक उपेक्षेचे तटस्थपणे चित्रण केले आहे. एक सुशिक्षित – सुसंस्कृत मनाच्या शिक्षकाची सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवर होणारी घुसमट हा या आत्मकथनाचा विषय आहे.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Mukkam Post Devache Gothane By Madhav Kondavilkar (मुक्काम पोस्ट देवाचे गोठणे माधव कोंडविलकर)
- +

Recently Viewed

Recently Viewed Books