Marathyanchya Dakshinetil Paulkhuna By Amar Shreerang Salunkhe (मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा)
Marathyanchya Dakshinetil Paulkhuna By Amar Shreerang Salunkhe (मराठ्यांच्या दक्षिणेतील पाऊलखुणा)
श्री शहाजीराजे, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्यकाळात दक्षिण मार्तात मराठ्यांच्या घडलेल्या घडामोडी व त्यांचे आजचे अस्तित्व यांचा संशोधनात्मक मागोवा.
दक्षिण भारतात मराठ्यानी बांधलेले किल्ले, निर्माण केलेल्या राजधान्या, वसवलेली गावे, त्यांच्या पराक्रमाची साक्ष देणारी शहरे, मराठ्यांच्या दक्षिणेत झालेल्या लढाया, त्यांच्यावर आधारित शिलालेख, मराठ्यांची समाधी स्थळे अशा अनेक प्रकारची संशोधनात्मक माहिती आपल्याला या या म मधून वाचायला मिळणार आहे. दक्षिण भारताकडे गेल्या काही वर्षात पर्यटक व इतिहास प्रेमींचा ओढा वाढलेला आहे. परंतु सर्वात मोठा प्रश्न असतो तो तिथे जाऊन नक्की काय पहावे, भाषा आणि भूगोल या अडचणींवर मात करता येऊन जास्तीत जास्त किल्ले, मंदिरे, समध्या, शिल्पे, राजवाडे, राजधान्या इ. अभ्यासता यावीत म्हणून इतिहास आणि भूगोलाची सांगड घालून दक्षिण भारतात विखुरलेली मराठ्यांच्या पराक्रमाची यशोगाथा वाचकांच्या भेटीस आणत आहे