Rudra Enterprises , Free express shipping with orders over ₹ 1499
TOP DIWALI ANK
Your cart is empty now.
महाराष्ट्राला इतिहास संशोधकांच्या परंपरेतील वा.सी. उर्फ वासुदेव सीताराम बेंद्रे हे एक महत्त्वाचे नाव आहे. संशोधक, लेखक म्हणून बेंद्रे यांची कारकिर्द मोठी आहे. ९० वर्षांच्या वाटचालीत त्यांनी ५७ हून अधिक इतिहास ग्रंथसंपदा निर्माण केली. वयाच्या ८० व्या वर्षी ‘राजाराम महाराज चरित्र’ प्रकाशित करून कामावरील निष्ठा व्यक्त करणारे बेंद्रे हे वेगळेच विद्वान होते. आधुनिक महाराष्ट्राच्या घडणीत बेंद्रेंचा मोठा वाटा आहे. भारत इतिहास संशोधन मंडळाला संस्थात्मक स्वरूप प्राप्त करून देण्यात त्यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. ऐतिहासिक कागदपत्रांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांच्याकडे पेशवे दफ्तरातील ऐतिहासिक कागदपत्रांचे संकलन करण्याची जबाबदारी दिली होती. त्यांच्या या संशोधनातून प्रसिद्ध झालेली ग्रंथसंपदा गेली अनेक वर्षे दुर्मिळ झाली होती. अशा या ग्रंथमालेतील बेंद्रे यांनी लिहिलेले सहा ग्रंथ नुकतेच प्रकाशित झाले आहेत. ‘मालोजीराजे आणि शहाजी महाराज’,‘छत्रपती शिवाजी महाराज’ (पूर्वार्ध व उत्तरार्ध), ‘शिवराजाभिषेक प्रयोग’,‘छत्रपती संभाजी महाराज’ आणि 'छत्रपती राजाराम महाराज' हे सहा ते सहा ग्रंथ होय. बेंद्रे यांच्या ‘छत्रपती संभाजी महाराज’ या ग्रंथाने समाजात विलक्षण खळबळ उडवून दिली. सुमारे ४० वर्षे त्यांनी या विषयाचा धांडोळा घेतला. हजारो कागदपत्रे आणि साधने त्यांनी एकत्रित केली. दोन वर्षात मराठ्यांच्या विशेषतः संभाजी महाराजांच्या इतिहास विषयक साधनांचे संशोधन व त्या करिता इंडिया हाउस व ब्रिटीश म्युझियम मधील ऐतिहासिक साधनांचे सुमारे २५ खंड होतील एवढी सामुग्री परत आणली.
Guaranteed safe checkout:
Orders Ship Within 3 To 5 Business Days.
Recently Viewed Books