Aaple Rakat By Dr. Manasi Rajadhyaksha ( आपले रक्त )
Aaple Rakat By Dr. Manasi Rajadhyaksha ( आपले रक्त )
पाणी हे संपूर्ण विश्वातलं एक अजब रसायन आहे. तेवढंच अचंबित करणारं
आणखी एक रसायन म्हणजे रक्त! ते शरीरात अखंडपणे वाहत राहतं.
अतिशय जबाबदारीच्या अनेक प्रक्रिया अगदी बेमालूमपणे पार पाडतं.
संपूर्ण शरीराची अनेक प्रकारे काळजी घेतं. त्यामुळेच अनेक प्राणिमात्रांमध्ये
रक्ताला आधारभूत मानलेलं आहे.
रक्त हे काही घटकांचं बनलेलं असल्याने ते पाण्यासारखं पातळ आणि
पारदर्शी नाही. अशा या रक्तात नेमके कोणते घटक असतात? शरीरात
रक्त तयार कुठे होतं? त्यांचा शरीरभरातील प्रवास कसा घडतो? हे सगळं
जर आपल्या शरीराच्या आत चाललेलं असतं, तर त्याची अगदी मूलभूत
माहिती तरी आपल्याला असायला हवी, नाही का?
अशी माहिती असणं का आवश्यक आहे? कारण आपण खात असलेलं अन्न,
त्यातून निर्माण होत असलेली ऊर्जा, आपण श्वसनाद्वारे शरीरात घेत असलेला
ऑक्सिजन, या सर्वांचा रक्ताशी फार घनिष्ठ संबंध आहे. तो संबंध नेमका काय
आहे याची सविस्तर माहिती देणारं हे पुस्तक मुलांसह प्रत्येकाने वाचावं असं आहे.
Aaple Rakat | Dr. Manasi Rajadhyaksha
आपलं रक्त | डॉ. मानसी राजाध्यक्ष