Rudra Enterprises | Free over ₹ 1499 |All India Fast Delivery| (100% Original Books)

नवीन प्रकाशित पुस्तकांची यादी

Rs. 300.00Rs. 255.00
Availability: 50 left in stock

रुटीन'.. सध्याच्या काळातला एक परवलीचा शब्द. पण याच रुटीनला २०२० मध्ये कोरोनामुळे काहीसा ब्रेक लागला आणि अनेकांची आयुष्ये बदलली. आधी केवळ रविवार पुरेसे मर्यादित असलेले वर्क फ्रॉम होम काही महिने रुटीन बनले. या वातावरणात आपापले काम सांभाळत अनेकांना त्यांच्या छंदाची नव्याने ओळख झाली. अशावेळी लॉकडाऊनचा फायदा आपल्याला कसा करता येईल, याचा विचार मलाही खुणावत होता. आणि मग सुरू झाला श्रीगणेशा नवीन कथांचा.. असे म्हणतात की, नसते / नसावे. कला जेवढी जोपासली जाते, तेव्हा त्यातील बारकावे लक्षात येतात. तीन वर्षांपूर्वी ‘आराध्य प्रकाशन'च्या 'तळघर' या स्वलिखित पुस्तकाला मिळालेला भरघोस प्रतिसाद पाहून लिखाणात आणखी काही सुधारणा करता येईल? याचा विचार करुन पुन्हा नव्याने लिखाणाला सुरुवात केली. वाचनात तोचतोचपणा जाणवू नये, म्हणून भय, गूढ, रहस्य, राजकारण, पूर्वजन्म, भविष्याबद्दल असलेली जिज्ञासा अशा गोष्टींचा समन्वय साधून नव्या कथा मांडणे काहीसे आव्हानात्मक होते. वेळप्रसंगी 'ॐ गूगलाय नमः' म्हणत काही संदर्भ वाचले. पण त्यानिमित्ताने अनेक नव्या गोष्टींची सखोल माहिती मिळाली, हेही नसे थोडके..ज्यांनी माझ्या लेखनकलेला पुढे आणले. अर्थात मानसीताईच्या 'आराध्य प्रकाशन'ला या सर्व कथा पुस्तकरुपात आणण्याचे श्रेय आहेच. या पुस्तकात समाविष्ट केलेल्या कथा संपूर्णत: काल्पनिक असल्या तरीही वेगळे विषय मांडायचा एक छोटासा प्रयत्न केला आहे. या सर्व कथा तुम्हाला पुन्हा एकदा खिळवून ठेवतील, अशी आशा करतो.

Guaranteed safe checkout:

apple paygoogle paymaestromasterpaypalvisa

Orders Ship Within 3 To 5 Business Days.

Ajuni.. Yovanat Me By Aanand Madhukar Malashe ((अजुनि.. यौवनात मी!) )
- +

Recently Viewed

Recently Viewed Books