{"product_id":"yuvraj-sambhajiraje-aani-sati-godavari-by-dr-jaysingrao-patil-युवराज-संभाजीराजे-आणि-सती-गोदावरी-डॉ-जयसिंगराव-पवार","title":"Yuvraj Sambhajiraje Aani Sati Godavari By Dr. Jaysingrao Patil (युवराज संभाजीराजे आणि सती गोदावरी - डॉ. जयसिंगराव  पवार)","description":"\u003cp\u003eपाने ११२ \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eडॉ. जयसिंगराव पवार यांनी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठातून एम.ए. (सर्वप्रथम) आणि पीएच.डी. पदवी संपादन केली. तीन दशकांहून अधिक काळ महाविद्यालयीन क्षेत्रात विद्यार्थिप्रिय प्राध्यापक म्हणून अध्यापन केले. महाविद्यालयातील एम.ए.पर्यंतच्या विद्याथ्र्यांसाठी २० क्रमिक पुस्तके लिहिली. शिवाजी विद्यापीठाचे पहिले कुलगुरू व इतिहास संशोधक डॉ. अप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. जयसिंगराव यांच्या संशोधन कारकिर्दीला १९६४ मध्ये सुरुवात झाली. या विद्यापीठातील इतिहास विभागात त्यांनी ऐतिहासिक कागदपत्रांच्या संशोधनाचा अनुभव घेतला. त्यांनी महाराणी ताराबाई, सेनापती संताजी घोरपडे, मराठेशाहीचा मागोवा, राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ इत्यादी एवूÂण २५पेक्षा अधिक इतिहासविषयक ग्रंथ लिहिले. निरनिराळ्या इतिहास परिषदांमध्ये तसेच संशोधनपर नियतकालिकांत त्यांचे ४५हून अधिक शोधनिबंध प्रसिद्ध झाले. त्यांनी अनेक इतिहास परिषदांचे अध्यक्षस्थान भूषविले. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषदेचे ते संस्थापक - सदस्य आणि नंतर तीन वर्षांसाठी अध्यक्ष होते. त्यांनी १९९२ मध्ये महाराष्ट्र इतिहास प्रबोधिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे संस्थापक-संचालक म्हणूनही ते कार्यरत होते. इतिहास संशोधन व त्याद्वारा समाजप्रबोधन हे त्यांचे उद्दिष्ट असून, त्यानुसार संस्थेतर्फे १२०० पानांचा, तीन खंडांचा राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ २००१मध्ये प्रसिद्ध केला. भारतातील १६ भाषांमध्ये तसेच रशियन, फ्रेंच, इटालियन, जपानी या परकीय भाषांमध्ये अनुवादाचे काम सुरू आहे. यांपैकी कन्नड, कोकणी, इंग्लिश, जर्मन, उर्दू व तेलुगू, आणि हिंदी भाषेतील ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. गुजराती व रशियन भाषेतील ग्रंथ प्रसिद्धीच्या मार्गावर आहेत. डॉ. जयसिंगराव शाहू संशोधन केंद्र, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या संस्थेचे संचालक आहेत.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mehta Publishing House","offers":[{"title":"Mehta Publishing House \/ Dr. Jaysingrao Pawar \/ Marathi","offer_id":47591871054082,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/3722.jpg?v=1774591049","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/yuvraj-sambhajiraje-aani-sati-godavari-by-dr-jaysingrao-patil-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%a4%e0%a5%80-%e0%a4%97%e0%a5%8b%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%9c%e0%a4%af%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%aa%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}