{"product_id":"yashswitecha-mulmutra-by-shubhashrao-gurav-यशस्वीतेचा-मूलमंत्र-लेखक-शुभाषराव-गुरव","title":"Yashswitecha Mulmatra By Shubhashrao Gurav (यशस्वीतेचा मूलमंत्र) लेखक – शुभाषराव गुरव)","description":"\u003cp\u003e\u003cstrong\u003eपाने ८३\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan style=\"text-decoration: underline;\"\u003eलेखकाचे मनोगत :\u003c\/span\u003e\u003cbr\u003eहे पुस्तक वाचकांच्या हातात देताना मला मनस्वी आनंद होत आहे. हे पुस्तक विज्ञानवादी दृष्टिकोन, विवेकनिष्ठ विचार सरणी, वास्तववादी विचार सरणी वाचकांच्या मनात निर्माण करील याची मला खात्री आहे. मन, मेंदू व मनगट यांच्या बळावरच माणसाने कर्तृत्व सिद्ध केले पाहिजे याच्यावर माझा ठाम विश्वास आहे, आणि हेच या पुस्तकात मांडले आहे. उत्तम कर्म केले असता उत्तम फळ मिळतेच, फक्त या हाताने उत्तम कर्म करीत रहा. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ जे सुरेख. परमेश्वर आहे का नाही हे मला माहित नाही परंतू कर्मालाच परमेश्वर मानलं व हातून उत्तम कर्म केलं तर \"फळ\" रुपी ईश्वर भेटल्याशिवाय राहणार नाही. जीवन कौशल्य नेहमीच जीवन कसे जगावे हे शिकवतात. वाचकांनी जास्तीत जास्त जीवन कौशल्ये शिकून घ्यावीत व आचरणात आणावीत. त्यांना त्यांचे जीवन उच्च मूल्यांसहीत जगल्याचे समाधान वाटेल व आपण जीवनात एक उच्चस्तर अबाधित ठेवल्याचा अभिमान वाटेल. हे पुस्तक तुमचा आत्मविश्वास प्रचंड वाढवेल व इच्छाशक्ती प्रभावी करेल याची मला शंभर टक्के खात्री आहे. दृढ आत्मविश्वास व दूर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर माणूस जीवनात हवे ते करू शकतो. आपले व्यक्तिमत्त्व पूर्णपणे ओळखा, स्वतःमधील अंगभूत गुण (सुप्त गुण) वेळीच ओळखा, ते विकसीत करा, नैतिक मूल्यांची, जीवन मूल्यांची जपणूक करा व एक चारित्र्यवान व्यक्ती म्हणून समाजात लौकिक होऊ द्या. जीवन कौशल्य (Soft Skills) जास्तीत जास्त आत्मसात करून कौशल्य पूर्ण जीवन जगा. जीवनात जे जे विनासायास विनाकष्टाचे, विनामोबदला मिळाले आहे, त्याची जाणीव ठेवा. दात्याविषयी कृतज्ञतेची भावना जागृत ठेवा, तुम्हाला सकारात्मक विचारांची सवय लागेल.\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakahan And Rudra Publishing House \/ Shubhashrao Gurav \/ Marathi","offer_id":47587859333378,"sku":null,"price":200.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-26at12.34.35.jpg?v=1774509537","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/yashswitecha-mulmutra-by-shubhashrao-gurav-%e0%a4%af%e0%a4%b6%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%96%e0%a4%95-%e0%a4%b6%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b5-%e0%a4%97%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a4%b5","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}