{"product_id":"wadivasal-by-c-s-chellappa-वाडीवासल-सी-एस-चेल्लप्पा","title":"Wadivasal By C. S. Chellappa (वाडीवासल - सी. एस. चेल्लप्पा)","description":"\u003cp\u003eपाने 68 \u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eवाडीवासल’ ही सी. एस. चेल्लप्पा लिखित १९४९ साली प्रकाशित झालेली तामिळ भाषेतील अभिजात लघुकादंबरी असून तामिळनाडूच्या एका खेड्यात होणारा जल्लिकट्टू (बैलाला शरण आणण्याचा खेळ) हा खेळ या लघुकादंबरीचा विषय आहे.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eकादंबरीचा नायक पिक्ची हा एक उमदा तरुण या खेळात तरबेज मानल्या जाणाऱ्या कारी या बैलाविरुद्ध उभा ठाकतो. पिक्चीला कारीशी का झुंज द्यायची असते? जल्लिकट्टूमध्ये त्याला कारीलाच का नमवायचं असतं ? एका पशूवर विजय मिळवून त्याला असं काय मिळणार असतं? असे काही प्रश्न कादंबरी वाचताना वाचकाला पडत राहतात. कादंबरीच्या शेवटी त्याची उत्तरं तर मिळतातच; पण बैलाला नमवण्याच्या पिक्चीच्या अथक प्रयत्नांतून त्याचे धाडस, अभिमान आणि उच्चनीचतेची सामाजिक उतरंड असे अनेक पीळ आपल्याला या लघुकादंबरीत उलगडताना दिसतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमाणसाचे पशुवत समोरच्यावर ईष्र्येने झडप घालणे आणि पशूने माणसागत धूर्त विचारांनी खेळी खेळणे असा एक सूक्ष्मसा विरोधाभासही या कादंबरीत अधोरेखित केलेला आहे. ‘जल्लिकट्टू’ या क्रीडाप्रकाराच्या अतिशय चित्रमय आणि रोमांचकारी वर्णनामुळे ही कादंबरी वाचकाला खिळवून ठेवते. या खेळातील रांगडी ऊर्जा आणि त्याचे सांस्कृतिक महत्त्व या लघुकादंबरीत लक्षणीयरीत्या अधोरेखित केलेले आहे. रानटी पशुत्व, निसर्ग आणि सूडबुद्धीने ग्रासलेले मानवी व्यवहार या कादंबरीत ठळकपणे आविष्कृत होतात.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Popular Prakashan","offers":[{"title":"Popular Prakashan \/ C. S. Chellappa \/ Marathi","offer_id":47606866477314,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Vadivaasal_front-cover-MRP-150_2026.jpg?v=1774953974","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/wadivasal-by-c-s-chellappa-%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a5%80-%e0%a4%8f%e0%a4%b8-%e0%a4%9a%e0%a5%87%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}