{"product_id":"tumchi-aamchi-maay-by-indrajit-bhalerao-तुमची-आमची-माय","title":"Tumchi Aamchi Maay By Indrajit Bhalerao (तुमची आमची माय)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eएका खेड्यातली खात्त्यापित्या घरातली एक मुलगी विवाहानंतर सामान्य कुटुंबात येते. ज्या घरात खाण्यापिण्याचे वांधे असतात आणि घराला दाराच्या ऐवजी झोपाटा असतो, अशा घराला ती आपल्या अंगच्या कर्तृत्वानं आणि कर्तृत्ववान नवऱ्याच्या साहाय्यानं गरिबीच्या खातेऱ्यातून बाहेर काढते. देर, भाये, नंदा, जावा यांच्या मदतीनं सहा एकर जमिनीची एकशे सहा एकर जमीन करते. सगळ्यांना वाटतं, तिच्या पायात लक्ष्मी आहे. खरंतर तिच्या मनगटात कर्तृत्व होतं आणि मनात अदम्य विश्वास होता. देवावर तर तिचा विश्वास होताच.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eदेराभायांपासून वेगळं निघाल्यावर ती आपल्या मुलांना शिकवण्याची जिद्द धरते. एकाला कवी-लेखक, तर एकाला शास्त्रज्ञ बनवते. आपल्या चारही लेकी खात्यापित्या घरी पडाव्यात अशी व्यवस्था करते. सगळ्या लेकी, सुनांची पंचवीसेक बाळंतपणं करून, सगळी सांसारिक कर्तव्यं पार पाडून, सुखानं आराम करण्याऐवजी ती संन्यास घेऊन नव्या विश्वात प्रवेश करते. आता कुणा एकाची आई न राहता ती विश्वाची आई होते. एक आध्यात्मिक उंची गाठते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअशा आईच्या भोवतीच्या वीस माणसांनी दाखवलेले तिच्या आयुष्याचे हे विविध कंगोरे. खऱ्या अर्थानं आजची मदर इंडिया म्हणता येईल अशा प्रातिनिधिक भारतीय स्त्रीचं हे समग्र दर्शन.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Aditya Prakashan Aurangabad","offers":[{"title":"Aditya Prakashan Aurangabad \/ Indrajit Bhalerao \/ Marathi","offer_id":47361124827394,"sku":null,"price":298.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/tumchiamchimaay-f.jpg?v=1770958715","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/tumchi-aamchi-maay-by-indrajit-bhalerao-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%ae%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%af","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}