{"product_id":"swatantraveer-savarkar-by-chandrakant-kumar-स्वातंत्र्यवीर-सावरकर-चंद्रकांत-कुमार","title":"Swatantraveer Savarkar By Chandrakant Kumar (स्वातंत्र्यवीर सावरकर - चंद्रकांत कुमार)","description":"\u003cp\u003eभारतीय स्वातंत्र्यलढा हा अनेक स्वातंत्र्य सेनानीचा लढा आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे त्यापैकी एक अग्रणी नाव आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eस्वातंत्र्यवीर सावरकर ही व्यक्ती फक्त क्रांतीकारक म्हणून भारत देशाला ज्ञात असती तर अभिमान वाटला असताच पण हे एकमेवाद्वितीय अनमोल रत्न लेखणीतसुद्धा भले बहादूर नावजले, यांच्या स्मृतीस शतशः अभिवादन करावे तितुके थोडे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eएक असाही वाचकवर्ग समाजात वावरत असतो की, त्याला इतिहासाची अविट गोडी असते. इतिहासातील क्रांतिकारक, त्यांनी घेतलेले कष्ट, इतिहासातील राजे-राजवाडे, त्यांच्या आठवणी सांगणारे किल्ले, दुर्ग यांची माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून ते धडपडत असतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमनोरंजन आणि बोध याच्याही पलीकडे जाऊन काही लेखक मंडळी अद्वैताचे भांडारच वाचकांना उपलब्ध करून देतात. वीर सावरकर हे त्यातीलच एक लेखक. अंदमानात घडलेला दिनक्रम सांगण्याचा मनसुबा स्वातंत्र्यवीरांनी मनावर घेतल्यानंतर वाचकांचे कुतुहल जागे होणारच.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eब्रिटिशांनी आपल्या हिंदूस्थानावर म्हणजे भारत देशावर सत्ता लादली होती. ब्रिटीश साम्राज्याविरूद्ध दंड थोपटणे त्याकाळी सोपे नव्हते, पण मातृभूमीसाठी त्याग नावाची एक प्रेरणा त्या काळात तरुण रक्तात तयार झाली होती.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसरकार विरोधात बंड पुकारल्या कारणाने स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटीश न्यायालयाने दोन जन्मठेपेची शिक्षा दिली होती. त्यांच्यावर जॅक्सनच्या वधाला मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. दोन खटले या महान क्रांतीकारकावर चालवण्यात आले.\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Chandrakant Kumar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47529727721730,"sku":null,"price":30.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.53.12.jpg?v=1774002410","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/swatantraveer-savarkar-by-chandrakant-kumar-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%b5%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%b0-%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%95%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}