{"product_id":"soneri-kiran-by-m-d-korgaonkar-सोनेरी-किरण-म-द-कोरगावकर","title":"Soneri Kirane By M.D. Korgaonkar (सोनेरी किरणे - म. द. कोरगावकर )","description":"\u003cp\u003eआपला लेखन प्रवास ललित लेखनाने सुरु करणाऱ्या सरांनी कथा लेखनाकडे लक्ष दिले आणि त्यांना योग्य तो सूर मिळू लागला आसपास घडणाऱ्या घटना, परिचितांच्या आयुष्यात घडणाऱ्या बऱ्या वाईट घटना ह्याचा मागोवा, त्याचे निरीक्षण करीत त्यांच्यातील लेखकाने अचूकपणे घेऊन त्याला कथारूप दिले हे त्यांचे लेखन कौशल्य कौतुकास्पद आहे. म्हणून तर ह्या संग्रहातील कथा वाचताना त्या इथेच आसपास घडल्या आहेत असे जाणवू लागते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआपल्या मनात असलेला विचार, कथानक कथेच्या रूपातून वाचताना त्यातील सहजपणा वाचकांना खिळवून ठेवतो. कथेसाठी हवी असणारी संवेदनशीलता, पात्रांच्या तोंडचे संवाद, वातावरण निर्मिती सहज सुलभभाषा ह्यातून त्यांच्या कथा वाचनीय झालेल्या आहेत हे निर्विवाद. सतरा कथांतून त्यांची निरीक्षण शक्ती, अनुभव, तसेच त्यांचे मनन, चिंतन, पात्रांच्या रूपाने आलेले जीवन विषयक तत्वज्ञान प्रकर्षाने जाणवते. अनेकदा ह्या कथा वाचताना त्यांना लालित्याचे आवरण असल्याचा भास होतो. त्यांच्यातील शिक्षक खुणावतो. मूल्यांचा असलेला आदर जाणवतो.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रत्येक कथेतून लेखक काही ना काही संदेश देतात तो संस्कारांचा, इतिहास बनत चाललेल्या मूल्यांचा.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअनेकदा 'अरे हा अमुकच्या आयुष्यात घडलेला अनुभव आहे', हे असे घडलेले मी ऐकले आहे अशा प्रतिक्रिया वाचताना मनात येऊ शकते हे एका परीने लेखकाच्या निरीक्षणाचे, शब्दसामर्थ्याचे त्याला कथारूप देण्याच्या कौशल्याचे यश म्हणायला हवे.\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"M.D. Korgaonkar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47531979669762,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at15.44.19.jpg?v=1774007689","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/soneri-kiran-by-m-d-korgaonkar-%e0%a4%b8%e0%a5%8b%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%b0%e0%a4%a3-%e0%a4%ae-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}