{"product_id":"sindhi-by-rohini-tukdeo-onkar-thorat-सिंधी-रोहिणी-तुकेदेओ-ओंकार-थोरात","title":"Sindhi By Rohini Tukdeo, Onkar Thorat (सिंधी - रोहिणी तुकेदेओ, ओंकार थोरात )","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजिच्याशी तुमचं सारं आयुष्य सर्वार्थाने बांधलं गेलेलं असतं, त्याच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eभूमीतून अचानक उखडून फेकलं जातं आणि एका क्षणात होत्याचं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनव्हतं होतं. तेव्हा समोर सर्वत्र नुसता अंधार पसरतो. जगण्याचे सारे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमार्ग बंद होतात. कुठे जावं, काय करावं आणि कसं जगावं असे \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनेक प्रश्न समोर उभे ठाकतात. तरीही जगण्याची धडपड सुटत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनाही. रडतखडत, ठेचकाळत का होईना धडपड चालू राहते आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएक वेगळं विश्व नव्यानं साकारते. त्याचीच ही कहाणी आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eखरंतर ही कहाणी आहे सिंधी समूहाची. ज्यांनी फाळणीची दाहकता \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनुभवली, अचानक उद्ध्वस्त करून टाकणाऱ्या स्थलांतराची वेदना \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअनुभवली, त्यानंतरची विस्थापितांच्या वाट्याला येणारी आयुष्याची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eफरफट आणि ससेहोलपट अनुभवली अशा सिंधी समूहाची ही कहाणी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआहे. यात व्यथा आहेत, वेदना आहेत, विरहाचं दुःख आहे, जगणं उद्ध्वस्त \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eझाल्याची आणि परिणामी सारं काही गमावल्याची तीव्र सल आहे. \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसं असूनही त्यात दुःखाला कवटाळून बसण्याचं भावनाशून्य गोठलेपण \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनाही, तर यातून बाहेर पडण्याची सजगपणे केलेली धडपड आणि नवी \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमूल्ये अंगीकारत नव्यानं उभं राहत वेगळी ओळख निर्माण करण्याची \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eउमेद आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Onkar Thorat \/ Marathi","offer_id":47647014093058,"sku":null,"price":382.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Manovikas Prakashan \/ Rohini Tukdeo \/ Marathi","offer_id":47647014125826,"sku":null,"price":382.0,"currency_code":"INR","in_stock":false}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SindhiCover-800x800.jpg?v=1775802871","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sindhi-by-rohini-tukdeo-onkar-thorat-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%a7%e0%a5%80-%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a3%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%81%e0%a4%95%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%93-%e0%a4%93%e0%a4%82%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}