{"product_id":"silver-needle-by-sumedh-vadawala-risbud-सिल्व्हर-नीड्-ल","title":"Silver Needle By Sumedh Vadawala (Risbud)  (सिल्व्हर नीड्‌ल )","description":"\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eएस.यू.व्ही. मर्सिडीज बाहेर पार्क करून संजय हिरासकर डोंबिवलीच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eस्मशानात गेले. परिचिताचा अंत्यविधी आटोपला. स्वच्छतागृहात जाऊ \u003c\/span\u003e\u003cspan\u003eलागले; पण आतल्या आवाजाने पावलं थबकली.\u003c\/span\u003e\u003cspan\u003e“काही वर्षांपूर्वी आमच्या पायांशी झुकत होता, पॅन्टीची मापं घ्यायला. \u003c\/span\u003e\u003cspan\u003eत्याने आता मर्सिडीजमधून फिरावं? काही काळे धंदे केल्याशिवाय का \u003c\/span\u003e\u003cspan\u003eपांढरी मर्सिडीज घेता आलीय?”\u003c\/span\u003e\u003cspan\u003eहिरासकर तसेच माघारी फिरले. वयाच्या अकराव्या वर्षी त्यांनी शिवणकामाला \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसुरुवात केली होती. साठी ओलांडण्यापूर्वी पर्यटनस्थळी स्वत:चं आलिशान हॉटेल \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसुरू केलं. मधल्या वर्षांत इम्पोर्टेड कापडविक्री, दूधविक्री, ट्रान्सपोर्ट, जमीनविक्री, \u003c\/span\u003e\u003cspan\u003eसेकंड होम कन्स्ट्रक्शन अशा नाना व्यवसायांचे यशस्वी अनुभव घेताना लोकांना \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजमीनदार करण्यात ते रमून गेले. डोंबिवलीतल्या बकाल चाळीत राहणारा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eशिंप्याचा एक मुलगा डोंबिवलीतला पहिला मर्सिडीजवाला व्हावा, हे लोकांच्या \u003c\/span\u003e\u003cspan\u003eअसूयेचं कारण ठरलं. वाइल्डलाइफ फोटोग्राफीचा छंद जपण्यासाठी त्याने \u003c\/span\u003e\u003cspan\u003eजगप्रवास करावा हे विस्मयाचं कारण ठरलं... कष्टांच्या बळावर कोणत्याही \u003c\/span\u003e\u003cspan\u003eवयात नव्याने व्यावसायिक होता येतं, सचोटीने श्रीमंत होता येतं याचा पुरावा \u003c\/span\u003e\u003cspan\u003eदेणारी ही कहाणी तरुणांना आणि प्रौढांना कृतीप्रवण करेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Sumedh Vadawala","offer_id":46209558774018,"sku":"","price":272.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SilverNeedle-800x800.jpg?v=1749641499","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/silver-needle-by-sumedh-vadawala-risbud-%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b9%e0%a4%b0-%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%a1%e0%a5%8d-%e0%a4%b2","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}