{"product_id":"shree-swami-samarth-upasana-v-falshruti-by-dr-yashwantrao-patil-श्री-स्वामी-समर्थ-उपासना-व-फलश्रुती","title":"Shree Swami Samarth Upasana V Falshruti By Dr. Yashwantrao Patil (श्री. स्वामी समर्थ उपासना व फलश्रुती))","description":"\u003cp\u003eलेखकांचे मनोगत :- \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eश्री. यशवंतराव शंकरराव पाटील (सर) यांनी श्री सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थांची भक्ती करता करता अतिशय मेहनतीने एक प्रबंध (The-sis) तयार केला. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीलाचरित्रावर आजवर विपुल साहित्य लिहिले गेले आहे. त्यात गद्य चरित्रे, पद्मचरित्रे (ओवीबद्ध पोथ्या) पदे, भजने, स्तोत्रे, स्फुट लेख, कादंबऱ्या, चित्रपट-मालिका असे विविध प्रकारचे साहित्य आहे. या सर्व साहित्याची यादी जरी वाचली तरी चकित व्हायला होते. हा एक मोठा विशाल साहित्यसागरच आहे. खरे तर हे सारे साहित्य म्हणजे श्रीस्वामी समर्थांची वाङ्मय मूर्तीच आहे असे म्हणावयास हरकत नाही.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eयापैकी बहुतेक सारे वाङ्मय श्री. पाटील सरांनी मोठ्या आस्थेने वाचून, अभ्यासून, तीन वर्षे कसून मेहनतीने प्रबंध लिहिलाही; तरीही महाआरतीचा साग्रसंगीत सोहळा झाल्यावर जशी भावपूर्ण मंत्रपुष्पांजली म्हणावी तशी प्रबंधाची निर्मिती झाल्यावर श्री. पाटील सरांनी 'नाचू गाऊ आनंदे' या नावाची ही एक छोटीशी (मंत्रपुष्पांजलीसदृश) साहित्यकृती तयार करून ती सर्व स्वामिभक्तांसाठी प्रकाशित केली आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eप्रबंध लेखन करताना त्यांनी संशोधनपूर्वक चिकित्सा करीत करीत श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अवतारकार्याचा सर्व बाजूंनी वेध घेतला आहेच. पाने 176\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Dr. Yashwantrao Patil \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47493512298754,"sku":null,"price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at11.52.13.jpg?v=1773988981","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shree-swami-samarth-upasana-v-falshruti-by-dr-yashwantrao-patil-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5-%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%a8%e0%a4%be-%e0%a4%b5-%e0%a4%ab%e0%a4%b2%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}