{"product_id":"shikshan-shidori-by-hanumant-salgaonkar-शिक्षण-शिदोरी-हनुमंत-साळगांवकर","title":"Shikshan Shidori By Hanumant Salgaonkar (शिक्षण शिदोरी- हनुमंत साळगांवकर)","description":"\u003cp\u003eमनोगत...\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eमी शिक्षण तज्ञ नाही, पण प्राथमिक शिक्षक मात्र आहे. शिक्षण, शिक्षकी पेशासंबंधी हे साहित्य उपलब्ध दिले आहे. त्यातून अनेकांना मार्गदर्शनही मिळेल, पण कोणास उपदेश द्यावा हा हेतू नाहीच! माझ्या आयुष्यातील ४४ वर्षे शिक्षक या नात्याने वावरताना जे अनुभवले त्याचे हे शब्दांकन !शिक्षक असताना माझे परम मित्र श्री. मनोहर द. कोरगावकर यांचेकडून आग्रहास्तव द्वै मासिक 'पाथेय', 'शिक्षण विकास' मधील माझे काही लेख प्रसिद्ध झाले. लेख वाचून गोवा राज्याचे माजी शिक्षणमंत्री प्रा. गोपाळराव मयेकर, यांनी अनेकदा आपल्या भाषणात उल्लेख केला होता, त्याच बरोबर कधी स्पर्धेत अथवा शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमात असताना जे विचार ऐकले ते लिहून काढले, ते काही शिक्षकांच्या, पालकांच्या वाचनात आले, तेव्हा त्यांनी प्रोत्साहन देऊन 'असेच लिहा, आम्हास मार्गदर्शन लाभेल' असे उद्गार काढले, मी निवृत्त झालो.माझे मन मला जाणवू लागले, त्यामुळेच हे लेख एकत्र करून ठेवलेले. आज पुस्तक रूपाने वाचकांच्या हाती देत आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसध्या प्राथमिक शिक्षण व शिक्षकांविषयी आदरभाव दुणावत चालला आहे. त्याची कारणे अनेक असतील. याचे आत्मसंशोधन करणे जरूर आहे. मी माझ्या ४४ वर्षाच्या शिक्षकी जीवनात जे आचरले, जे दिसले, ते टिपले. प्रामाणिकपणे चिंतन करून संयमवृत्ती व सेवाभावाने लेखन केले.माझ्या वाडवडिलांची पुण्याई व सद्गुरू कृपा असेल, गोमंतक मराठी अकादमीकडून श्री. बाळकृष्ण वामन सावर्डेकर प्राथमिक शिक्षक 'आदर्श शिक्षक' पुरस्कार (२००६) शिक्षक विकास परिषदेकडून 'राष्ट्रीय शिक्षक भूषण' बेळगाव (२०१३) असे बहुमान मिळाले. याशिवाय शाळा, क्लब, संस्थांमार्फत सुद्धा मानसन्मान व पुरस्कार प्राप्त झाले. शिक्षकी पेशा स्वीकारून मी धन्य झालो. भावी शिक्षकांनी हे पुस्तक अवश्य वाचून 'हंसक्षीर' या न्यायाने पावन करावे, माझे शिक्षकीपेशातील जीवन सार्थकी लागले असे होईल! पाने 96\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Hanumant Salgaonkar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing \/ Marathi","offer_id":47493971509506,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at12.44.46.jpg?v=1773993037","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/shikshan-shidori-by-hanumant-salgaonkar-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b7%e0%a4%a3-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%a6%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b9%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%82%e0%a4%a4-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b3%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}