{"product_id":"savvi-te-dhavi-साव्वी-ते-धाव्वी","title":"Savvi Te Dhavi ( साव्वी ते धाव्वी )","description":"\u003ch2 class=\"product_title entry-title elementor-heading-title elementor-size-default\"\u003eSavvi Te Dhavi ( साव्वी ते धाव्वी )\u003c\/h2\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\u003cbr\u003e\u003c\/div\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cdiv\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eलेखक: डॉ. वसंत राजपूत\u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003e\u003cspan\u003eआधी डॉक्टर आणि नंतर भारतीय राजस्व सेवेतील अधिकारी असे यश मिळवण्याचे लौकिक टप्पे गाठल्यानंतर ‘मी कसा यशस्वी झालो?’ या विषयावर बेस्टसेलर पुस्तक लिहिण्याऐवजी वसंत राजपूत यांनी अक्कलकुव्यासारख्या दुर्गम भागातल्या निवासी शाळेतील जीवनानुभवावर आधारित कादंबरी लिहिली, हे विशेष आहे. एक किशोरवयीन मुलगा घरातली सुरक्षित मायेची उब सोडून निवासी शाळेतल्या दडपवून टाकणाऱ्या अवकाशात प्रवेश करतो, तिथल्या अनोळखी वास्तवावर आपल्या जीवनोर्मीच्या नख्या रोवत टिकून राहतो आणि नंतर तिथल्या समग्र भवतालाशी एकरूप होतो. या सगळ्या प्रवासाचे त्या किशोरवयीन मुलाच्या नजरेतून घडवले जाणारे बहुस्तरीय दर्शन अनोखे आणि मौल्यवान आहे. विद्यार्थ्यांच्या टोळीवजा जीवनातून पाझरणाऱ्या आदिम जाणिवा आणि त्यामध्ये सहावी ते दहावी असे इयत्तेगणिक होत जाणारे बदल लेखकाने सहज कुशलतेने टिपलेले आहेत. शाळेचा परिसर आणि बाहेरचे जग यामधला सांधा असणाऱ्या शाळेच्या भिंती, विद्यार्थ्यांच्या विश्वाचे केंद्र असलेल्या वसतिगृहाच्या इमारती, चित्रपटांच्या मायावी जगाचे मधाचे बोट दाखवणारे गावातले व्हिडिओ पार्लर, शाळेचे फाटक, शेजारून जाणारा रस्ता, त्यावरून चालणारी जनावरे आणि शाळेच्या भोवताली वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या रूपात दर्शन देणारा निसर्ग या सगळ्या गोष्टी जिवंत पात्ररूप घेऊन कादंबरीभर वाचकाला भेटत राहतात आणि कह्यात घेतात. शाळेच्या आणि वसतिगृहाच्या बंदिस्त वातावरणात बहरणारे किशोरवयीन मुलांचे बहुआयामी भावजीवन उलगडवताना लागलेला प्रामाणिक स्वर लेखनाला एका वेगळ्या उंचीवर नेतो.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e\n\u003c\/div\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"New Era Publising House \/ Dr. Vasant Rajput \/ Marathi","offer_id":51172890771714,"sku":null,"price":297.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Savi-te-Dhavi-F.jpg?v=1795417883","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/savvi-te-dhavi-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80-%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%80","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}