{"product_id":"savidhan-bhan-by-shriranjan-aavate-संविधान-भान-श्रीरंजन-आवटे","title":"Savidhan Bhan By Shriranjan Aavate (संविधान भान - श्रीरंजन आवटे)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसंविधानकर्त्यांचे शपथपत्र होते मानवी मूल्यांसाठी. नेहरुंनी सांगितलेल्या नियतीच्या काव्यात्म करारासाठी. गांधींच्या ‘वैष्णव जन तो तेणे कहिए’ म्हणणा−या भारतासाठी. बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या समताधिष्ठित समाजासाठी. ताठ मानेने जगता येईल, अशा टागोरांच्या भीतीशून्य समाजासाठी. साने गुरुजींच्या प्रेमाचा धर्म सांगणा−या बलशाली भारतासाठी. दाक्षायणी वेलायुधनच्या गावकुसाबाहेरच्या आभाळासाठी. जयपालसिंग मुंडांच्या आदिवासी पाड्यातल्या ‘उलगुलान’साठी. मौलाना आझादांच्या ‘गंगा जमनी तहजीब’ सांगत शिक्षणाची कास धरणा−या इंद्रधनुषी भारतासाठी. सावित्रीबाईंच्या शाळेचा रस्ता अधिक प्रशस्त होण्यासाठी. बुद्धाच्या पिंपळासाठी. माणसातला ईश्वर जागवणा−या गुरु नानकांसाठी. खुल्या दिलानं माफ करणा−या येशूसाठी. बाजाराच्या मधोमध उभं राहून सर्वांच्या कल्याणाची प्रार्थना करणा−या कबीरासाठी. संत रवीदासांच्या बेगमपु−यासाठी. तुकोबाची गाथा तारणा−या इंद्रायणीसाठी आणि चेतना चिंतामणीच्या गावाचा रस्ता सांगणा−या ज्ञानोबासाठी. या शपथपत्राला जागण्यासाठीचा हा जेंटल रिमांइडर !\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Rohan Prakashan \/ Shriranjan Aavate \/ Marathi","offer_id":47688040644866,"sku":null,"price":786.5,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/SanvidhanFront.jpg?v=1776943225","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/savidhan-bhan-by-shriranjan-aavate-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%a8-%e0%a4%b6%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%b0%e0%a4%82%e0%a4%9c%e0%a4%a8-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%9f%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}