{"product_id":"sansadetil-teen-tape-by-arvind-lele-संसदेतील-तीन-टप्पे","title":"Sansadetil Teen Tape By Arvind Lele (संसदेतील तीन टप्पे)","description":"\u003cp\u003eखा. अटलबिहारी वाजपेयी हे भारताचे या घडीचे एक सर्वोच राजकीय नेते तो निर्धार, धवल चारित्र्य आणि अलौकिक वक्तृत्व आदि सद्रणसमुचयाने मंडित झालेले आहेत. प्रभावी संसदपटुत्व, विविध विषयांचा सखोल व्यासंग, मूलगामी चिंतन, ना दूरदृष्टी, सत्तेच्या राजकारणात राहूनही भारतीय जीवनमूल्यांची जपणूक करण्याचा त्यांचे व्यक्तिमत्त्व हा स्वातंत्र्योत्तर भारताचा राजकीय, सामाजिक जीवनाचा एक अमोल आया आहे. अनेक पुरस्कार देऊन समाजाने त्यांचा गौरव केला असून राष्ट्रपतींनीही ‘पद्मविभूषण’ पुरस्कार देऊन त्यांच्या कर्तृत्वाचा यथोचित सन्मान केला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eखा. अटलजींनी वयाच्या अवघ्या एकतिसाव्या वर्षी संसदेत लोकसभेत पदार्पण केले. त्यावेळी सत्ताधारी पक्षात आणि विरोधी पक्षात अनेक नामांकित संसदपटू होते, परंतु आपल्या पहिल्याच भाषणाने तरुण खा. अटलजींनी पं. नेहरूंपासून साऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. A great parliamentarian is coming अशी ललकारीच जणू त्या भाषणाने दिली. अवघ्या दोन-तीन वर्षात त्यांचे भाषण ऐकण्यासाठी संसदगृहात आणि पत्रकारकक्षांत गर्दी होऊ लागली. राजकारणातील सर्व विचारप्रवाह आणि विविध विचारांची वृत्तपत्रे खा. अटलजींची दखल घेऊ लागले. त्यानंतर गेल्या उण्यापुऱ्या चाळीस वर्षात खा. अटलजींची कीर्तीपताका सतत नवनवी शिखरे पादाक्रांत करीत आहे.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Arvind Lele \/ Marathi","offer_id":47647951782146,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Atal-Cover-F.jpg?v=1775807032","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/sansadetil-teen-tape-by-arvind-lele-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b8%e0%a4%a6%e0%a5%87%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%a8-%e0%a4%9f%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%aa%e0%a5%87","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}