{"product_id":"prerana-parakram-aani-pradnya-by-navnath-jagtap-प्रेरणा-पराक्रम-आणि-प्रज्ञा-नवनाथ-जगताप","title":"Prerana, Parakram Aani Pradnya by Navnath Jagtap (प्रेरणा, पराक्रम आणि प्रज्ञा - नवनाथ जगताप )","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eतुकोबांचे ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप  | \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cstrong\u003eपाने - ३५२ \u003c\/strong\u003e\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eजगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज हे केवळ वारकरी संप्रदायाचे आधारस्तंभ नसून, ते मानवी मनाचा अचूक ठाव घेणारे एक महान युगपुरुष आहेत. शेकडो वर्षांपूर्वी त्यांनी मांडलेले विचार आजही आपल्याला अंधारात प्रकाशाची वाट दाखवतात. आजच्या धकाधकीच्या, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जगात शांत व समाधानी आयुष्य कसे जगावे? याचे उत्तम मार्गदर्शन तुकोबांच्या गाथेत आढळते. याच कालातित विचारांचे सार अत्यंत सोप्या आणि प्रवाही भाषेत मांडणारे पुस्तक म्हणजे 'तुकोबांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे'.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eशिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे । लेखक - नवनाथ जगताप  | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १७६ \u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eछत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एका युगाचे नायक नव्हते; तर ते तेज, शौर्य आणि नीतीचे चालते-बोलते विद्यापीठ होते. शून्यातून स्वराज्य उभारणाऱ्या या युगपुरुषाचे व्यवस्थापन कौशल्य आणि दूरदृष्टी आजही कालातित आहे.\u003cbr\u003e'शिवरायांची ५१ प्रेरणादायी जीवनसूत्रे' हे पुस्तक महाराजांच्या तेजस्वी चरित्रातून वेचलेले ५१ अमूल्य मंत्र आहेत. या सूत्रांमध्ये प्रभावी नेतृत्व, अचूक नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि निस्सीम राष्ट्रप्रेमाची गुरुकिल्ली दडलेली आहे.\u003cbr\u003eसंकटांवर मात करण्याची प्रेरणा देणारे आणि जीवनाला नवी दिशा दाखवणारे शिवरायांच्या विचारांचे हे अमृत विद्यार्थ्यांपासून ते मोठ्या व्यावसायिकांपर्यंत, प्रत्येकासाठी एक तेजस्वी प्रकाशवाट आहे. इतिहासाच्या पानातून वर्तमानाला सामर्थ्य देणारा हा प्रेरणास्रोत तुम्ही नक्की वाचा!\u003c\/p\u003e\n\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cbr\u003e\u003cstrong\u003eगनिमी कावा :अजिंक्य युद्धनितीचा गुढ मंत्र। लेखक - नवनाथ जगताप | \u003c\/strong\u003e\u003cstrong\u003eपाने - १५२\u003c\/strong\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eशिवाजी महाराज आणि त्यांचे सेनापती गनिमी कावा युद्ध तंत्रात इतके माहीर आणि वाकबगार होते की स्वराज्याचे कट्टर शत्रू असलेल्या मोगली सैन्याला ते हातोहात मूर्ख बनवत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eडॉ. बाळकृष्ण\u003cbr\u003eथोर इतिहासकार, तथा कोल्हापूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअसामान्य योद्ध्याचे अद्ययावत गुण शिवाजी महाराजांमध्ये ठासून भरलेले होते. याबरोबरच त्यांच्यात कमालीची चपळाई होती. त्यामुळे युद्धाचा निकाल बऱ्याचदा त्यांच्या बाजूने होई. एका टोकाशी युद्ध जिंकल्यानंतर क्षणार्धात ते दुसऱ्या आघाडीवर दिसत, तिकडे हाहाकार माजवून तिकडली महत्त्वाची ठाणी ते झटपट काबीज करत असत.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eअंबे कॅरे\u003cbr\u003eएक प्रसिद्ध समकालीन इंग्रज वकील\u003c\/p\u003e","brand":"Rudra Publishing House","offers":[{"title":"Rudra Publishing House \/ Navnath Jagtap \/ Marathi","offer_id":48017518002434,"sku":null,"price":693.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-06-18at12.07.36.jpg?v=1781765128","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/prerana-parakram-aani-pradnya-by-navnath-jagtap-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%ae-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%9c%e0%a5%8d%e0%a4%9e%e0%a4%be-%e0%a4%a8%e0%a4%b5%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%a5-%e0%a4%9c%e0%a4%97%e0%a4%a4%e0%a4%be%e0%a4%aa","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}