{"product_id":"palikadche-man-by-m-d-korgaonkar-पलीकडचे-मन-म-द-कोरगावकर","title":"Palikadche Man By M.D. Korgaonkar (पलीकडचे मन -म. द. कोरगावकर)","description":"\u003cp\u003eमाझे 'पलीकडचे मन' हे पुस्तक वाचकांच्या हाती देताना मला अत्यंत आनंद होत आहे. यापूर्वी 'ओंजळ' हा गोमंतक मराठी अकादमीने प्रसिद्ध केलेला कथासंग्रह, 'जसे पाहावे तसे' हा ललित लेखसंग्रह व 'शिक्षण - वाटा आणि वळणे' हा शिक्षणविषयक लेखसंग्रह या तीनही पुस्तकांचे वाचकांनी स्वागत केले. त्या बळावरच लेखनात एकेक पाऊल टाकण्याचे धाडस झाले, असे म्हणायला हरकत नाही. माझे ललित लेखन गोमंतकातील वृत्तपत्रांतून प्रसिद्ध होत होते. त्यावर कधी कधी वाचकांशी, मित्रांशी संवाद व्हायचा त्यातून काही अप्रत्यक्षपणे सूचनाही मिळायच्या. या साऱ्याचा उपयोग हे सर्व साहित्य पुस्तकरूपाने प्रसिद्ध करीत असताना निश्चितच होतो. आपलेच साहित्य पुनः पुनः वाचताना काही त्रुटी जाणवतात, काही इष्ट बदल सुचतात व त्याचा फायदा पुनर्लेखनाच्या वेळी होत असतो. हा अनुभव एक वाचक व लेखक म्हणून मलाही आलाच. कला आणि संस्कृती संचालनालयाच्या 'गोमंतकीय लेखकासाठी आर्थिक अनुदान' या योजनेअंतर्गत माझ्या पुस्तकाची निवड करण्यात आली. याबद्दल कला आणि संस्कृती संचालनालयाचे ऋण व्यक्त करणे हे माझे कर्तव्यच! माझ्या या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक व समीक्षक डॉ. न. म. जोशी यांनी आशिर्वादरुपी प्रस्तावना लिहिली ही गोष्ट माझ्यासारख्या सामान्य लेखकाचे मनोधैर्य वाढविणारी आहे. त्यांचा आशिर्वाद माझ्या पुढील साहित्यप्रवासाला प्रेरणा देणारा तसेच मार्गदर्शक करणारा आहे हे निश्चित !bआशा आहे, 'पलीकडचे मन' या ललित लेखसंग्रहाचे वाचक स्वागत करतील.पाने 103\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Muktangan Prakashan And Rudra Publishing \/ M.D. Korgaonkar \/ Marathi","offer_id":47483719549186,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-18at15.31.56.jpg?v=1773828184","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/palikadche-man-by-m-d-korgaonkar-%e0%a4%aa%e0%a4%b2%e0%a5%80%e0%a4%95%e0%a4%a1%e0%a4%9a%e0%a5%87-%e0%a4%ae%e0%a4%a8-%e0%a4%ae-%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%b0%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}