{"product_id":"pageer-bharat-daundkar-पागीर-भरत-दौंडकर","title":"Pageer | Bharat Daundkar (पागीर । भरत दौंडकर)","description":"\u003cp style=\"text-align: center;\"\u003e\u003cstrong\u003eपागीर । भरत दौंडकर\u003c\/strong\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपागीर म्हणजे हाताने फेकता येणारं गोलाकार जाळं. एकदा का हे जाळं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअंगावर पडलं की ते माशांची जिवंत सळसळ थांबवतं. अंगावर पडलेल्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपागीरातून माशांना निसटता येत नाही. पागीर खांद्यावर घेऊन नदीकाठ \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eधुंडाळणारे कोळी, भोई दिसतात. त्यांच्या जीवन संघर्षाची धडपड भरत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eदौंडकर यांनी रेखाटली आहे. हे एका कवीचं गद्यलेखन असल्याच्या खुणा \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eपाना-पानावर दिसून येतात. माशांचे अगणित प्रकार, जाती, लक्षणं, वैशिष्ट्य \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eया लेखनात आहेत. वाम, कटला, रोहू, मरळ अशी नावं आपल्याला परिचित \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअसतात पण खदरा, खडशी, बोबर, मुळांड, तांभरा, इचका, आहेर, सुरक्या, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eशेंगळ, कुर्डु अशी माशांची असंख्य स्थानिक नावं... भीमा, भामा, इंद्रायणी, \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eमुळा, मुठा, गोदावरी, पंचगंगा, कृष्णा अशा अनेक नद्यांच्या पोटात सामावणारं\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eहे चमचमणारं चांदणं. जणू पाण्याच्या पोटातली चांदी...\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eकाळ बदलला. चिलापीसारख्या माशांचं प्रस्थ वाढत गेलं. तर कुठे प्रदूषणाचं \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eजहर पाण्यात मिसळल्यानेही अनेक जाती नामशेष व्हायला लागल्या. माणूस \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eआणि मासा दोघांचंही सारखंच आहे. ज्यांची धडपड, सळसळणं अविरत आणि \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनिरंतर तेच जीवनाच्या संघर्षात टिकतात. भरत दौंडकर यांच्या पागीर मधून \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eनदीच्या पोटातल्या खळबळ, तगमग आणि तडफडीचा तसेच नदीकाठच्या \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eलोकजीवनाचा दुर्लक्षित पदर खूपच बारकाव्यानिशी आला आहे. तरतरीत \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eअशा नव्या संदर्भांचा ऐवज या लेखनात आहे. वाचकांना हे लेखन नक्कीच \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003eवेगळा आनंद देऊन जाईल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e\n\u003cp dir=\"ltr\"\u003e\u003cspan\u003e- आसाराम लोमटे        \u003c\/span\u003e\u003cspan\u003e\u003cspan class=\"Apple-tab-span\"\u003e \u003c\/span\u003e\u003c\/span\u003e\u003cspan\u003e \u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Bharat Daundkar \/ Marathi","offer_id":48248194760962,"sku":null,"price":254.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Pagir_CoverArtwork-800x800.jpg?v=1785761243","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/pageer-bharat-daundkar-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%b0-%e0%a4%ad%e0%a4%b0%e0%a4%a4-%e0%a4%a6%e0%a5%8c%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}