{"product_id":"noteshansaha-bhaktigeete-bhaag-2-by-chandrakant-sane-नोटेशनसह-भक्तिगीते-भाग-२","title":"Noteshansaha bhaktigeete bhaag -2 By Chandrakant Sane (नोटेशनसह भक्तिगीते भाग – २)","description":"\u003cp\u003e \u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुंदर ते ध्यान’ किंवा ‘ओंकार स्वरुपा’ यांसारखे भक्तिरसाने ओथंबलेले भगवंताच्या आळवणीचे सूर प्रभातसमयी वाऱ्यावर लहरत कानावर आले की सकाळ कशी मंगलमय होते.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eआजच्या पॉप आणि जॅझच्या संगीताच्या जमान्यातही गेली ४०-४२ वर्षे अवीट, मधुर शब्दांच्या भक्तिगीतांनी आपलं मन व्यापलं आहे. ही भक्तिगीते आपल्या थकलेल्या मनाला शांतता व आनंद देतात.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eचंद्रकांत साने यांचे हे असेच भक्तिरसात चिंब भिजवणारे, नवोदित गायक, वादक व कलाकारांसाठी राग, ताल, संगीतातील शैक्षणिक व तांत्रिक माहिती आणि मार्गदर्शन करणारे आनंददायी पुस्तक.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eही भावपूर्ण भक्तिगीते फक्त गायची नाहीत तर पेटी व कॅसिओवर वाजवायची आहेत. लेखकाने सखोल अभ्यास करून नोटेशनच्या चिन्हांचा परिचय करून दिला आहे. या पुस्तकात एकूण ३० गाण्यांचा परिचय राग, आरोह, अवरोह व मूळ गायक यासह दिला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभक्तिगीतांसाठी वैशिष्ट्यपूर्ण मार्गदर्शन, प्रत्येक गाण्यासाठी खास टीप, पेटी कशी वाजवायची याबद्दल उपयुक्त सूचना, सरावासाठी पलटे व अलंकार याची माहिती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपरिपूर्ण असे हे पुस्तक अल्पावधीतच लोकप्रिय झाले असून त्याला\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसुरूवातीपासून उत्तम प्रतिसाद मिळाला आहे.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eनवोदितांनो या पुस्तकातून अभ्यास करा, सराव करा, तुमचा कार्यक्रम लोकांना नक्कीच आवडेल.\u003c\/p\u003e","brand":"Nitin Prakashan","offers":[{"title":"Nitin Prakashan \/ Chnadrakant Sane \/ Marathi","offer_id":47636349452546,"sku":null,"price":212.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/bhaktigeete-bhag-2.png?v=1775727853","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/noteshansaha-bhaktigeete-bhaag-2-by-chandrakant-sane-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%9f%e0%a5%87%e0%a4%b6%e0%a4%a8%e0%a4%b8%e0%a4%b9-%e0%a4%ad%e0%a4%95%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%97%e0%a5%80%e0%a4%a4%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-%e0%a5%a8","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}