{"product_id":"nokarnama-by-vitthal-ray-bhat-नोकारणामा-विठल-राय-भट-1","title":"Nokarnama By Vitthal Ray Bhat (नोकारणामा-विठल राय भट )","description":"\u003cp\u003eहे आत्मचरित्र नव्हे.\u0026amp;nbsp;एस्.एस्.सी. परीक्षा पास झालेल्या दिवसापासून (सोळाव्या वर्षी) ते थेट निवृत्त होईपर्यंतच्या (वय ५८) दिवसांपर्यंत विविध नोकऱ्यांत आलेले अनुभव या पुस्तकात नोंदविले आहेत. नोकरी करताना भेटलेली, लक्षात राहण्यासारखी माणसे, काळजाला भिडलेले अनुभव व माझी सर्वसाधारण निरीक्षणे यात नोंदविली आहेत. माझे वैयक्तिक व कौटुंबिक जीवन तसेच, खारमध्ये राहत असताना केलेल्या सामाजिक-राजकीय इत्यादी कामांचा तपशील. 'जांबावली ते आंबिवली' या आगामी पुस्तकात येणार आहे.\u0026amp;nbsp;साधारणबावीस वर्षे खारला राहिल्यानंतर गेली चोवीत वर्षे मी कल्याणजळील आंबिवली येथे राहतो. इथे रहायला आल्यापासून मी लेखनकार्याला जोमदारपणे सुरुवात केली. अजूनपर्यंत (जून २००६) माझी २७ मराठी व ३ इंग्रजी पुस्तके प्रकाशित झालेली आहेत. शिवाय इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजीतून २५ पुस्तकांचा एक संच पण प्रकाशित झाला आहे. या सवांचा तपशील व साहित्य क्षेत्रातील कडू-गोड आठवणी 'इये ग्रंथाचिये नगरी' या पुस्तकात शब्दबद्ध केले जातील.\u0026amp;nbsp;हे पुस्तक लिहिताना लेखनिक म्हणून कु. कांचन कुलकर्णी, व कु. प्रियांका चव्हाण, कु. सोनाली जाधव यांची बहुमोल मदत झाली. तिघींचीही हस्ताक्षरे सुंदर व वळणदार. या पुस्तकाची मुद्रणप्रत कु. कांचन कुलकर्णी हिने तयार करून दिली. या लेखनिकांचा मी अत्यंत आभारी आहे.\u0026amp;nbsp;माझे मित्र, मुक्तंगण प्रकाशनाचे मालक श्री. राजू भानारकर यांनी प्रकाशनाची जबाबदारी स्वीकारली, त्याबद्दल मी त्यांचा ऋणी आहे. पाने 104\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47493444862210,"sku":null,"price":90.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-20at11.40.48.jpg?v=1773987061","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nokarnama-by-vitthal-ray-bhat-%e0%a4%a8%e0%a5%8b%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%a3%e0%a4%be%e0%a4%ae%e0%a4%be-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%9f-1","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}