{"product_id":"nisargach-nayanramya-lenn-karwar-by-vitthal-ray-bhat-rajesh-divekar-निसर्गाच-नयनरम्य-लेण-कारवार-विठ्ठल-राय-भट-राजेश-दिवेकर","title":"Nisargach Nayanramya Lenn Karwar By Vitthal Ray Bhat , Rajesh Divekar (निसर्गाच नयनरम्य लेण कारवार -विठ्ठल राय भट , राजेश दिवेकर )","description":"\u003cp\u003eमनोगत\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eरावणाचा वध केल्यावर प्रभू श्रीराम-बंधु लक्ष्मण व पत्नी सीता यांच्यासह आयोध्येकडे कूच करण्याच्या तयारीत होते. तेव्हा विभीषणाने रामानां, \"प्रभो, तुम्ही लंका जिंकलेली आहे. तुम्हीच लंकाधिपती व्हा व इथेच रहा.\" अशी गळ घातली. त्यासाठी विभीषणाने लक्ष्मणाचे मन अगोदरच वळवून घेतले होते. पण | रामचंद्राने ती मागणी अमान्य करत सांगितले, \"लक्ष्मणा, लंका सुंदर, समृद्ध व सुवर्णमयी आहे हे खरे आहे. तरी पण मला ती आवडत नाही. कारण जननी व जन्मभूमी ही मला स्वर्गाहुनी श्रेष्ठ वाटतात.\"\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eकारवार जिल्हा, हा पूर्वी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' मध्ये धारवाड, बेळगांव व विजापूर या तीन जिल्ह्यांसह 'बॉम्बे कर्नाटक' म्हणून ओळखला जात होता. भाषावार प्रांत रचनेच्या वेळी 'बॉम्बे प्रेसिडेन्सी' तून गुजरात व महाराष्ट्र अशी दोन वेगळी राज्ये निर्माण करण्यात आली व 'बॉम्बे कर्नाटका'तील चार जिल्हे हे कर्नाटक राज्यात समाविष्ट करण्यास आले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eपूर्वी कारवार जिल्ह्यातील, लोक साहजिकच नोकरी-धंदा निमित्त मुंबईला जात असत. सुशिक्षित वर्ग मोठ्या प्रमाणात मुंबईत स्थायिक व मग जगभर पसरला. असे असलेतरी कारवारी माणूस आपली जन्मभूमी, मायभाषा कोकणी व संस्कार विसरला नाही. त्याची नाळ कारवारशी घट्ट जुळलेली आहे. नव्या पिढीला कारवारची व कोंकणीची तेवढीशी माहिती नाही हे खरं आहे. त्यांना आपल्या भूमीबाबत जबरदस्त कुतूहल आहे. पाने 104\u003c\/p\u003e","brand":"Muktangan Prakashan And Rudra Publishing House","offers":[{"title":"Vitthal Ray Bhat \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47533435552002,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true},{"title":"Rajesh Divekar \/ Muktangan Prakashan And Rudra Publishing House \/ Marathi","offer_id":47533435584770,"sku":null,"price":100.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/WhatsAppImage2026-03-21at10.08.31.jpg?v=1774070037","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nisargach-nayanramya-lenn-karwar-by-vitthal-ray-bhat-rajesh-divekar-%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%97%e0%a4%be%e0%a4%9a-%e0%a4%a8%e0%a4%af%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%a3-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a0%e0%a5%8d%e0%a4%a0%e0%a4%b2-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%ad%e0%a4%9f-%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a5%87%e0%a4%b6-%e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}