{"product_id":"nahi-maniyale-bahumata-by-nanda-khare-नाही-मानियले-बहुमता","title":"Nahi Maniyale Bahumata By Nanda Khare (नाही मानियले बहुमता)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eसुमारे तीस वर्षांच्या पटावर घडलेल्या लेखनापैकी हे काही निवडक लेख. वेगवेगळ्या नियतकालिकांसाठी, वेगवेगळ्या काळांत, वेगवेगळ्या विषयांवर लिहिले गेलेले. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eत्यामुळे त्यांतलं सूत्र शोधणं कठीण आहे; पण अशक्य मात्र नाही. कारण लिहिणारा माणूस एकच आहे. त्या माणसाची विज्ञान-विवेक यांच्यावर असलेली निष्ठा, \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसगळ्या लोकांना सुखी-समाधानी आयुष्य मिळावं अशी आस, आणि मुख्य म्हणजे - माणसांवर नि जगण्यावर असलेलं निरतिशय प्रेम - सुरुवातीपासून शेवटपर्यंत अभंग राहिलेलं दिसतं. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eमराठी वाचकाला, आणि त्यातही ज्ञानाकरता भुकेल्या असलेल्या तरुण दोस्तांना विज्ञान, तत्त्वज्ञान, विवेकवाद या विषयांवरचं सकस साहित्य उपलब्ध करून दिलं पाहिजे हा ध्यास त्यामागे आहे. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eहे एकदा लक्षात आलं, की तर्ककठोर भाव, नर्मविनोद, श्रद्धेसारख्या गोष्टींशी संवादण्याचा खुलेपणा, तत्त्वज्ञानातल्या कूटप्रश्नांबद्दलचं कुतूहल, वैचारिक शिस्त, विषयांचं \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eअफाट वैविध्य, भाषिक लवचीकपणा... अशा अनेक गुणांचं नवल वाटेनासं होतं. \u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eचिंतनाचा पैस अवाढव्य आहे खरा पण केंद्रबिंदूपाशी मात्र तुम्हां-आम्हां सगळ्यांच्या जगण्याविषयीची आस्था आहे\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manovikas Prakashan","offers":[{"title":"Manovikas Prakashan \/ Nanda Khare","offer_id":46182436929794,"sku":"","price":680.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0709\/4848\/7426\/files\/Nahi_20Maniyale_20Bahumata-800x800.jpg?v=1748599710","url":"https:\/\/pustakvishva.com\/products\/nahi-maniyale-bahumata-by-nanda-khare-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%ac%e0%a4%b9%e0%a5%81%e0%a4%ae%e0%a4%a4%e0%a4%be","provider":"Rudra Enterprises","version":"1.0","type":"link"}